'पोलिसांवरील हल्ले खपवून नाही घेणार'

 Mumbai
'पोलिसांवरील हल्ले खपवून नाही घेणार'

पोलिसांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही असा इशाराच राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिलाय. पोलिसांवर हात उगारल्यास कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलंय.  मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे कारवाईदरम्यान राजकीय हस्तक्षेप होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.  त्यामुळे माथूर यांनी चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. पोलिसांच्या कारवाईबाबात काही आक्षेप असल्यास वरिष्ठांशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले.

Loading Comments