अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक

 Dharavi
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक
Dharavi, Mumbai  -  

धारावी परिसरातून अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका महिलेला धारावी पोलिसांनी अटक केली आहे. या महिला आरोपीचे नाव क्षमा असे आहे. या महिलेकडून पोलिसांनी 1 किलो 600 ग्रॅम वजनाचा गांजा, 300 ग्रॅम चरस, कोडेन फाॅस्फेट सिरपच्या 120 बाटल्या आणि आनि निटरवेल्स गोळ्यांचे 20 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या अंमली पदार्थांची बाजारातील किंमत 83 हजार रुपये इतकी आहे.

धारावी येथील राजीव गांधी नगरातील पिवळा बंगला येथे एक महिला अंमली पदार्थ विकत असल्याची माहिती धारावी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून महिलेला अटक केली. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

Loading Comments