आजाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या

  Dharavi
  आजाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या
  मुंबई  -  

  आजाराला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना धारावीतल्या 90 फूट रस्त्यावरील साईबाबा नगर येथे शनिवारी घडली आहे. कमरुनिसा शेख (30) असे तिचे नाव असून, ती गेल्या अनेक वर्षांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होती. या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात रविवारी आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक आर.एम. बोडके अधिक तपास करीत आहेत.

  मिळालेल्या माहितीनुसार पोटदुखीच्या आजाराला कंटाळलेल्या कमरुनिसाने शनिवारी दुपारी घरात कोणी नसल्याचे पाहून कीटकनाशक द्रव्य पाण्यात टाकून प्यायले.  त्यामुळे तिला उलट्या होऊ लागल्या. उलट्यांचा आवाज ऐकून घराच्या माळ्यावरील तिच्या भावाने तिला तात्काळ उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले. कीटकनाशक द्रव्य संपूर्ण शरीरात भिनल्याने तिला तात्काळ अतिदक्षता विभागात हलविण्यात आलं. डॉक्टरांनी तिला वाचविण्यासाठी प्रयत्न केले मात्र तिच्याकडून उपचाराला कसलाही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर रविवारी पहाटे कमरुनिसा शेखने अखेरचा श्वास घेतला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.