बंद खोलीत आढळला महिलेचा मृतदेह

 Borivali
बंद खोलीत आढळला महिलेचा मृतदेह
Borivali, Mumbai  -  

बोरीवली पूर्व येथील राजेंद्र नगरमध्ये घरात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉली देसवी(50)असं मृत महिलेचे नाव असून,मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार डॉली देसवी(50) नावाची महिला सामवेद इमारतीमध्ये एकटीच राहत होती. त्या बोरीवलीमध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये कामाला होत्या. सकाळी त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी त्यांची विचारपूस करायला गेले तेव्हा त्या दोन दिवसांपासून कुणालाही भेटल्या नसल्याची माहिती त्यांना मिळाली.

 त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले आणि पोलीस आतमध्ये जाताच त्यांना महिलेचा मृतदेह बंद खोलीत आढळून आला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading Comments