सहप्रवाशाने सुरू केले अश्लील चाळे, महिलेची रिक्षातून उडी

रिक्षातून प्रवास करताना सहप्रवाशाने अश्लील चाळे सुरू केल्याने महिलेने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना अंधेरीमध्ये घडली. ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

सहप्रवाशाने सुरू केले अश्लील चाळे, महिलेची रिक्षातून उडी
SHARES

रिक्षातून प्रवास करताना सहप्रवाशाने अश्लील चाळे सुरू केल्याने महिलेने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना अंधेरीमध्ये घडली. ही महिला गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहप्रवाशी आणि रिक्षाचालकाला अटक केली आहे. अनिकेत जैस्वाल, सूरजकुमार राजभर अशी आरोपींची नावं आहेत. 

पश्चिम द्रूतगती महामार्गवरील गुंदवली सर्व्हिस रोडवरून एक महिला रिक्षातून चालली होती. मागच्या सीटवर तिच्या बाजूला एक प्रवासी बसला होता. काही अंतर पुढे रिक्षा गेल्यानंतर प्रवाशाने महिलेशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे महिलेने चालकाला रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, रिक्षाचालक हा मागे बसलेल्या त्याच्या मित्राच्या सांगण्यावरून रिक्षा न थांबवता पुढे जाऊ लागला. त्यावेळी  महिलेने धावत्या रिक्षामधून खाली उडी मारली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला, हाताला दुखापत झाली. त्यानंतर महिलेने अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार केली.

महिलेने दोघांचे वर्णन पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी रेखाचित्र काढले. तसंच रिक्षाच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यात आले. दोघांना शोधण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. घटनास्थळी भेट देऊन उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेरामधून संशयित ऑटोरिक्षाचे वर्णन व क्रमांक प्राप्त केले.  

पोलिसांनी कांदिवली येथे राहणारा रिक्षाचालक सूरजकुमार दूधनाथ राजभर आणि त्याचा मित्र अनिकेत महावीर जैस्वाल या दोघांना अटक केली. चौकशीमध्ये या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे अंधेरी पोलिसांनी सांगितले.



हेही वाचा -

कोरोना निर्बंधांविरोधात हॉटेलचालकांचं राज्यव्यापी आंदोलन

दुकानं सुरू करण्याचा निर्णय ३ दिवस लांबणीवर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा