मुंबईत महिलांवरील अत्याचारात २५ टक्क्यांनी वाढ, प्रजा फाउंडेशनचा अहवाल

मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पोलिस दल अपुरं पडत असल्याचे अहवालात सांगण्यात आलं आहे. परिणामी मुंबईतील ६४ टक्के गुन्हे हे तपासाविना पडून आहेत.

मुंबईत महिलांवरील अत्याचारात २५ टक्क्यांनी वाढ, प्रजा फाउंडेशनचा अहवाल
SHARES

मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं उघड झालं आहे. २०१८-१९ च्या तुलनेत २०१९-२०२० मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत २५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती प्रजा फाउंडेशनने दिली आहे. विशेष म्हणजे कोरोना संक्रमणाच्या काळात पोलिस रस्त्यावर असल्याने गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असले, तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटना या घडतच होत्या.

हेही वाचाः-  राज्यात कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत कायम

प्रजा फाउंडेशन या संस्थेच्या वतीने मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था आणि गुन्हे यावरील २०१९-२० या कालावधीचा अहवाल प्रकाशित केला. यामध्ये मुंबईतील पोलिसांची संख्या, गुन्ह्यांची आकडेवारी, तपासाविना असलेले गुन्हे, दोषसिद्धी प्रमाण याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार इतर गुन्ह्यांमध्ये घट झाली असली तरी बलात्कार आणि विनयभंग यांसारखे गुन्हे वाढले आहे. २०१८-१९ या वर्षात बलात्काराचे ७८४ गुन्हे तर विनयभंगाचे २ हजार ५३३ गुन्हे दाखल करण्यात आले होते. २०१९-२० या वर्षात बलात्काराचे ९०४ तर विनयभंगाचे २ हजार ६७७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. हत्येचा गुन्ह्यात घट झाली असून २०१९-२० मध्ये १६४ हत्येचे नोंदविण्यात आले आहेत.

  पोलिसांचा तुटवडा

मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पोलिस दल अपुरं पडत असल्याचे अहवालात सांगण्यात आलं आहे. परिणामी मुंबईतील ६४ टक्के गुन्हे हे तपासाविना पडून आहेत. मुंबई पोलिस दलामध्ये ५१ हजार ६८ इतकी पदे मंजूर आहेत मात्र ४१ हजार ७८८ पोलिस प्रत्यक्षात कार्यरत आहेत. फॉरेन्सिक लॅबमध्येही कर्मचाऱ्यांची कमतरता असून मंजूर पदांपेक्षा १७७ कर्मचारी कमी आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा