'हाऊसफुल्ल 4' च्या सेटवर डांसरचा विनयभंग


'हाऊसफुल्ल 4' च्या सेटवर डांसरचा विनयभंग
SHARES

हाऊसफुल्ल 4 च्या सेटवर एका महिला डान्सरचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चित्रकूट स्टुडिओमध्ये गुरुवारी रात्री शुटिंग सुरू असतान काही लोक जबरदस्तीने आत शिरले. दरम्यान आरडाओरड केली असताना त्यांनी विनयभंग केल्याचा आरोप महिला डान्सरने केला आहे. याप्रकरणी महिला डान्सरने अंबोली पोलिसांत गुन्हा नोंदवल्यानंतर पवन शेट्टी याला अटक करण्यात आली आहे. या चित्रपटाचं शुटींग सुरू असताना त्या ठिकाणी अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल हे उपस्थित होत.


संपूर्ण प्रकार

अंधेरीच्या चित्रकूट स्टुडिओमध्ये गुरुवारी रात्री 'हाऊसफुल्ल 4 चं' शुटिंग सुरू होतं. यावेळी एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी त्या ठिकाणी अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल उपस्थित होतं. त्याच वेळी पवन शेट्टी आणि सागर यांच्यासह अन्य सहा जण जबरदस्तीने आत घुसले. त्यावेळी शुटींग बंद करण्यासाठी दबाव टाकत असताना, त्याने महिला डान्सरसोबत अर्वाच्च भाषेत बोलत तिला चुकीचा स्पर्श केला.

कालांतराने पोलिस घटनास्थळी आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान या प्रकरणानंतर अक्षय कुमारने पीडितेला पोलिसांची मदत घेेण्याचा सल्ला दिल्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार नोंदवली.


पूर्ववैमन्यसातून वाद

मूळात हा सर्व प्रकार डान्सरमधील वादातून घडल्याचे सांगितले जात आहे.  डान्सर पवन शेट्टी आणि आमीर शेख या दोघांमध्ये पूर्ववैमन्यसातून वाद सुरू होते. याच वादातून पवनने हे शुटींग बद पाडल्याचं सांगितलं जात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा