दोन महिला कस्टम्सच्या जाळ्यात, 16 लाखांचा ऐवज जप्त


SHARE

मुंबई - मुंबई विमानतळावर कारवाई करत दोन महिलांना कस्टम्स विभागानं अटक केलीये. मिरा रोडला राहणाऱ्या दोघींकडून तब्बल 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मिरा रोडच्या शिवांगी पाटोदिया आणि शिवानी राज या दोघी मंगळवारी रात्री बहारीनहून आल्या. गल्फ एअरच्या विमानानं त्या मुंबई विमानतळावर उतरल्या. त्यानंतर तपासणीदरम्यान कस्टम्स विभागाने ही कारवाई केली. शिवांगी पाटोदियाने 423 ग्रॅमचे दागिने घातले होते आणि बुरखा पांघरला होता. दोघींकडून जवळपास 14.39 लाख किमतीचं 520 ग्रॅम सोनं, 1.77 लाख किंमतीचे चार सॅमसंगचे फोन आणि 1 आयफोन असा एकूण 16 लाख 16 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या