महिलांच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार

साकीनाका - महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि जागरूकतेसाठी सामाजिक संस्थेकडून साकीनाका येथे अभियान राबवण्यात आलं होतं. या अभियान कार्यक्रमात साकीनाका पोलीसही सहभागी झाले होते. या वेळी पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शन केलं. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर तुम्ही थेट पोलिसांशी संपर्क साधा असं आवाहन पोलिसांनी महिलांना केलं. कुर्ला,साकिनाका विभागातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांना तर मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो,  त्यामुळे या महिलांनी जागरूक होणं गरजेचं असल्याचं महिला आणि बाल विकास मंत्रालय अभियानाचे मुख्य निरीक्षक अखिलेश तिवारी यांनी सांगितलंय.

Loading Comments