यशवंत जाधव यांनी कंत्राटदाराला धमकावल्याचा आरोप, आँडिओ क्लिप वायरल

ई वॉर्डातील २०९ बीटमधील ई निविदाअंतर्गत सर्वात कमी रकमेची निविदा भरूनही आपणाला काम दिलं जात नाही, असा सोळंकींचा आरोप आहे. आपल्या जीवाला काही धोका निर्माण झाल्यास यशवंत जाधव, मनस्वी तावडे आणि राकेश सागठिया या त्रिकुटाला जबाबदार धरावे, असंही त्यांनी म्हटले

यशवंत जाधव यांनी कंत्राटदाराला धमकावल्याचा आरोप,  आँडिओ क्लिप वायरल
SHARES

महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) कंत्राटदाराला (Contractor) धमकी दिल्याच्या आरोपामुळं मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) वादात सापडलेत. मर्जीतला कंत्राटदार नेमण्यासाठी यशवंत जाधव यांनी आपणाला धमकावले, असा आरोप मेसर्स यश कॉर्पोरेशनचे कंत्राटदार रमेश सोळंकी (Contractor Ramesh Solanki) यांनी केला आहे. जाधव आणि सोळंकी यांच्यातल्या संभाषणाची ऑडिओ क्लिपच सध्या सर्वत्र वायरल झाली आहे.

हेही वाचाः- कंगनाला उत्तर देणार का? उर्मिला मातोंडकर म्हणाल्या…

यशवंत जाधव यांच्या ई वॉर्डमध्ये या कंत्राटदाराला कंत्राट मिळालं होतं. पण ते कंत्राट मागे घेण्यासाठी जाधव धमकीवजा इशारा देत,  निविदा मागे घेण्यास दबाव टाकत होते. ई वॉर्डातील २०९ बीटमधील ई निविदाअंतर्गत सर्वात कमी रकमेची निविदा भरूनही आपणाला काम दिलं जात नाही, असा सोळंकींचा आरोप आहे. आपल्या जीवाला काही धोका निर्माण झाल्यास यशवंत जाधव, मनस्वी तावडे आणि राकेश सागठिया या त्रिकुटाला जबाबदार धरावे, असंही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, जाधव यांनी सोळंकी यांनी केलेले सर्व आरोप बिन बुडाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रभागात ७ नगरसेवक असताना माझ्या विभागातच त्याने टेंडर भरलं. टेंडर नियमाप्रमाणे लागल्यानंतर कंत्राटदाराच्या बाबतीत माहिती घेणं माझं काम आहे. कंत्राटदाराने आधीची केलेली कामं बरोबर नसल्याचं मला समजलं, याची मला माहिती मिळाली. तुम्हाला काम करायचं असेल तर फोनवर बोलणं योग्य नाही. फोनवर कोणत्याही अशा कामाबद्दल बोलता येणार नाही. त्या कंत्राटदारानं माझ्याशी चुकीची वार्ता केली. तो टक्केवारीबद्दल बोलत होता. अशा पद्धतीनं बोलणं चांगलं नाही. कोणाशी बोलताय हे लक्षात घ्या, असा खुलासाही यशवंत जाधवांनी केला आहे.

Read this story in English
संबंधित विषय