येस बॅक घोटाळा : कॉक्स अॅड किंग्सच्या प्रमोटरला अटक

ईडीच्या तपासात येस बँकेतून कॉक्स अँड किंग कंपनीला कपूर यांनी पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात कर्ज दिले होते.

येस बॅक घोटाळा : कॉक्स अॅड किंग्सच्या प्रमोटरला अटक
SHARES

येस बँकेच्या ३६४२ कोटींच्या थकीत कर्जाप्रकरणी आंतरराष्ट्रीय टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी कॉक्स अँड किंग्सचे प्रमोटर पीटर केरकरला सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) गुरुवारी अटक केली.यापूर्वी याप्रकरणी ईडीने माजी सीएफओ अनिल खंडेलवाल व अंतर्गत ऑडीटर नरेश जैन यांना अटक केली होती.

हेही वाचाः- कोरोना काळात १८ टक्के कमी मनुष्यबळ असतानाही मुंबई पोलिसांनी जीवाची बाजी लावली

३६४२ कोटींचा हा गैरव्यवहार असून याबाबत ईडीने दिलेल्या माहितीनुसार, मालवर्न ट्रॅव्हल्स लि.युके यांचे ४९३ कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे. त्सााठी आरबीएस बँक, युके, स्टेट बँक ऑफ इंडिया, युके यांची बनावट बँक स्टेटमेंट जमा करण्यात आली होती. याशिवाय ऑडीटरचेही बनावट प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते. त्याच्या सहाय्याने येस बँकेकडून कर्ज घेण्यात आले होते. काॅग्स अँड किंग्स या कंपनीचेही त्यांच्या परदेशी सहाय्यकांचे बनावट बॅलेन्सशीट सादर केले. त्याची माहिती स्टॉक एक्सचेंजला देण्यात आली. त्यासाठी बनावट ग्राहक दाखवण्यात आले. याशिवय कर्ज थकवल्यानंतर फॉरेन्सिक ऑडीट करण्यासाठी व्यवस्थापनाने मदत केली नाही. याशिवाय कॉक्स अँड किंग्सचा सीएफओ अनिल खंडेलवाल याने ११०० कोटी एका कंपनीमध्ये फिरवले. त्यााबत बोर्डाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. याशिवय कॉग्स अँड किंगस् यांनी हॉलिडे ब्रेक एड्युकेशन लि. कंपनी ४३८७ कोटींना विकली. त्यातील रक्कम कर्ज फेडण्यासाठी न वापरता कुबेर इन्वेस्टमेंट, मॉरिशिअसमध्ये १५.३४ दशलक्ष अमेरिकन डॉलर हस्तांतरीत केले.त्या कंपनीवर पीटर केरकरचे नियंत्रण आहे. याशिवाय ईझीगो याच्यातील १५० कोटी रेड काईट प्रा. लि.मध्ये हस्तांतरीत केले.

नेमकं काय आहे प्रकरण

ईडीच्या तपासात येस बँकेतून कॉक्स अँड किंग कंपनीला कपूर यांनी पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात कर्ज दिले होते. त्यासाठी कपूर यांना मोठ्या प्रमाणात लाच मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. कर्ज मिळवण्यासाठी कॉक्स अँड किंग कंपनीकडून खोटे हिशोब सादर केले होते. या कंपनीने १६० जणांना एकंदर ९ कोटींचे पॅकेज विकल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात त्यातील अनेक जण अस्तित्वातच नसल्याचे निदर्शनास आले होते. कॉक्स अँड किंग कंपनीने आँक्टोंबरमध्ये दिवाळखोरी जाहिर केली. अनेकांची देणी थकल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यामध्ये प्रवर्तकांचा १२.२० टक्के हिस्सा दाखवण्यात आला. तर गुंतवणूक दारांचा ८७.८० टक्के हिसा दाखवण्यात आला. तसेच या कंपनीची इतर वित्त कंपन्यांकडे ५००० देणीही थकल्याचे दाखवण्यात आले. त्यात प्रामुख्याने सर्वात मोठी रक्कम ही येस बँकेची असल्याचे निदर्शनास आले. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर ईडीने याप्रकरणी कॉक्स अँड किंगचे प्रवर्तक पीटर केरकार यांना मार्च महिन्यात समन्स बजावला होता. येस बँकेने अनेक बड्या व्यावसायिकांना कर्ज दिले होते.

हेही वाचाः- राज्यात २५५३ नवीन रुग्णांची नोंद, तर दिवसभरात १०९ जणांच्या मृत्यूची नोंद

त्यानंतर ते कर्ज बुडीत निघाले. येस बँकेकडून कॉक्स अँड किंगने २२६० कोटींचे कर्ज घेतले होते. डीएचएफएलनंतर कॉक्स अँड किंग या कंपनीने येस बँकेकडून सर्वाधीक कर्ज घेतले होते. त्याप्रकरणी अधिक माहिती व पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने ही शोध मोहिम हाती घेतली असल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले. ही याप्रकरणातील दुसरी शोध मोहिम होती यापूर्वी येस बँकेतील गैरव्यवहार समोर आल्यानंतर ईडीने बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर आणि संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कारवाईनंतर राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर व त्यांच्या कुटुंबियांवर नुकतेच आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडशी (डीएचएफएल) संबधित असलेल्या नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीकडून (एनबीएफसी) कपूर कुटुंबाशी सबंधित असलेल्या डूइट अर्बन व्हेंचर प्राईव्हेट लिमिटेड कर्ज देण्यात आलं होते. या कंपनीत कूपर यांच्या मुली रोशनी, राधा व राखी यांचे समाभाग आहेत. त्याचवेळी डीएचएफएलकडे येस बँकेचे ३ हजार ७०० कोटींच कर्ज होते.

हेही वाचाः- दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? बोर्डाने दिलं हे उत्तर

राणा कपूर येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असताना या आर्थिक घडामोडी घडल्या त्यावर प्रकार टाकण्यात आला आहे. हे कर्ज देताना गहाण ठेवण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत ४० कोटींपेक्षाही कमी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. ते प्रत्यक्षात साडे सातशे कोटी रुपये किंमतीची असल्याचे दाखवण्यात आले होते. याप्रकरणी राणा व त्यांच्या पत्नीचे व्यवहार पाहणा-या एका महिलेचीही ईडीने चौकशी केली होती. त्यामुळे याप्रकरणी कपूर यांच्याशी संबंधीत १०४ कंपनी आता ईडीच्या रडावर आहेत. त्याप्रकरणी ईडी अधिक तपास करत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा