येस बँक घोटाळ्याचा संबध अंडरवर्ल्डशी?

वाधवान याचा कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्याशी संबंध असल्याने येस बँक घोटाळ्यात अंडरवल्डशी काही संबध आहे का हे आता ईडीच्या अधिकाऱ्याकडून पडताळले जात आहे.

येस बँक घोटाळ्याचा संबध अंडरवर्ल्डशी?
SHARES

येस बँकेला आर्थिक  डबघाईला आणणारे आता ईडीच्या रडारवर आले आहेत. घोटाळाग्रस्त येस बँकेचे अध्यक्ष राणा कपूर यांच्या प्रकरणात काही बँकांची बुडित कर्जांची सर्वच मोठी खाती ईडीच्या रडारवर असल्याची माहिती आहे. कपूर यांचा दिवाण हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे संस्थापक कपिल वाधवान यांच्याशी संबंध आहे. तर वाधवान याचा कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्याशी संबंध असल्याने येस बॅक घोटाळ्यात अंडरवल्डशी काही संबध आहे का हे आता ईडीच्या अधिकाऱ्याकडून पडताळले जात आहे. 

हेही वाचाः- मुंबईकरांना लवकरच होणार उन्हाळ्याची जाणीव

राणा कपूर यांनी परदेशी पैशांचा गैरवापर करीत मोठे कर्जवाटप केले. अशी अनेक कर्जखाती बुडित झाली. यामुळेच येस बँक भीषण तोट्यात गेल्याचा ईडीचा संशय आहे. परदेशी पैशांचा गैरवापर केल्याबद्दल मनी लॉन्डरिंग कायद्यांतर्गत ईडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यासाठी राणा कपूर हे ईडीच्या कोठडीत आहेत, तर त्यांच्या तिन्ही मुली तसेच पत्नीचा पासपोर्टही रेड अॅलर्टवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत हे कुटुंब देश सोडून जाऊ शकत नाही. ईडीतील सूत्रांनी सांगितले की, कपूर यांना ११ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. यादरम्यान प्रामुख्याने परदेशी रकमेचा नेमका कसा व कुठे उपयोग केला गेला, याबाबत माहिती काढली जात आहे. जी कर्जखाती बुडित झाली, त्यामध्ये काही वित्त तंत्रज्ञान क्षेत्रातील अर्थात अॅपआधारित पेमेंट कंपन्यांचाही समावेश आहे. 

हेही वाचाः- आदित्यच्या पर्यटनावर नजर ठेवणार अमित ठाकरे

यामुळेच त्या कंपन्या रडारवर आहेत.कपूर यांचा दिवाण हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे संस्थापक कपिल वाधवान यांच्याशी संबंध असल्याप्रकरणी ईडीने याआधीच तपास सुरू केला आहे. कपिल वाधवान हेदेखील दिवाण हौसिंगमधील घोटाळ्याबद्दल याआधीच ईडीच्या ताब्यात आहेत. त्यांचा कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्याशी संबंध असल्याप्रकरणीही ईडीने याआधीच तपास सुरू केला आहे. तर आता वाधवान, इक्बाल मिर्ची व राणा कपूर या नव्या साखळीचा तपास केला जात आहे. याखेरीज आरकेडब्ल्यू डेव्हलपर व डूइट अर्बन व्हेन्चर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्यालयांवरही ईडीने छापा घातला आहे. यासंबंधी काही कंपन्यांवर ईडी करडी नजर ठेऊन आहे. राणा कपूर यांच्या चौकशीतून काही ठोस माहिती मिळाल्यास अशा कंपन्यांवर छापे पडण्याची शक्यता आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा