Yes Bank घोटाळा: राणा कपूरला ईडीचा दणका, लंडनमधील १२७ कोटींची संपत्ती जप्त

ईडीच्या तपासात येस बँकेतून कॉक्स अँड किंग कंपनीला कपूर यांनी पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात कर्ज दिले होते. त्यासाठी कपूर यांना मोठ्या प्रमाणात लाच मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता.

Yes Bank घोटाळा: राणा कपूरला ईडीचा दणका, लंडनमधील १२७ कोटींची संपत्ती जप्त
SHARES

बहुचर्चित यस बँक (Yes Bank) घाटोळा प्रकरणात ईडीने राणा कपूर यांना मोठा दणका दिला आहे. ईडीने राणा कपूर यांची लंडनमधील १२७ कोटी रुपयांचे घर हे जप्त केले आहे.  अंमलबजावणी  सक्तवसूली संचालनालयाने (Enforcement Directorate) ने शुक्रवारी ही घोषणा केली. राणाचं ७७ साउथ ऑडली स्ट्रीट इथं त्यांच अपार्टमेंट होतं. या अपार्टमेंटची किंमत १३.५ मिलियन पाउंड म्हणजेच तब्बल १२७ कोटी रुपये एवढी आहे. कपूर यांनी २०१७ मध्ये ९.९ मिलियन पाउंडला (९३ कोटी ) हे घर घेतलं होतं.

ईडीच्या तपासात येस बँकेतून कॉक्स अँड किंग कंपनीला कपूर यांनी पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात कर्ज दिले होते. त्यासाठी कपूर यांना मोठ्या प्रमाणात लाच मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. कर्ज मिळवण्यासाठी कॉक्स अँड किंग कंपनीकडून खोटे हिशोब सादर केले होते. या कंपनीने १६० जणांना एकंदर ९ कोटींचे पॅकेज विकल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात त्यातील अनेक जण अस्तित्वातच नसल्याचे निदर्शनास आले होते. कॉक्स अँड किंग कंपनीने आँक्टोंबरमध्ये दिवाळखोरी जाहिर केली. अनेकांची देणी थकल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यामध्ये प्रवर्तकांचा १२.२० टक्के हिस्सा दाखवण्यात आला. तर गुंतवणूक दारांचा ८७.८० टक्के हिसा दाखवण्यात आला. तसेच या कंपनीची इतर वित्त कंपन्यांकडे ५००० देणीही थकल्याचे दाखवण्यात आले. त्यात प्रामुख्याने सर्वात मोठी रक्कम ही येस बँकेची असल्याचे निदर्शनास आले. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर ईडीने याप्रकरणी कॉक्स अँड किंगचे प्रवर्तक पीटर केरकार यांना मार्च महिन्यात समन्स बजावला होता. येस बँकेने अनेक बड्या व्यावसायिकांना कर्ज दिले होते. त्यानंतर ते कर्ज बुडीत निघाले. येस बँकेकडून कॉक्स अँड किंगने २२६० कोटींचे कर्ज घेतले होते. डीएचएफएलनंतर कॉक्स अँड किंग या कंपनीने येस बँकेकडून सर्वाधीक कर्ज घेतले होते. त्याप्रकरणी अधिक माहिती व पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने ही शोध मोहिम हाती घेतली असल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले. ही याप्रकरणातील दुसरी शोध मोहिम होती यापूर्वी येस बँकेतील गैरव्यवहार समोर आल्यानंतर ईडीने बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर आणि संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कारवाईनंतर राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती.

हेही वाचाः- उपमुख्यमंत्र्यांची 'मोठी' घोषणा, राज्यात कृषी सुधारणा व कामगार विधेयक लागू करणार नाही

न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले राणा हे घर विकण्याच्या प्रयत्नांमध्ये होते अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली. कपूर यांनी लाच घेऊन अनेक कंपन्यांना कोट्यवधींची कर्ज दिली आणि नंतर ती कर्ज ही एनपीए म्हणून दाखविण्यात आली होती. त्यामुळे बँकेचं काही हजार कोटींचं नुकसान झालं होतं. दीवान हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) च्या मनी लाँड्रिंग प्रकरणात एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ED) ने येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांना ८ मार्चला रविवारी पहाटे अटक केली होती. ईडीच्या अधिकार्‍यांनी सुमारे २० तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली होती. राणा कपूर यांनी अधिकारांचा गैरवापर करुन हजारो कोटी रुपये परदेशात पाठवले. त्याच सोबत काही कंपन्यांना नियम बाह्य अर्थ साह्य केलं असून कानपूर, दिल्ली इथं दाखल एका प्रकरणी ईडी तपास करत होती. त्यातून राणा कपूर यांचे नाव समोर आलंय. राणा कपूर यांच्या घरातील एका व्यक्तीच्या खात्यात वेळो वेळी मोठी रक्कम परदेशातून आल्याची माहिती देखील ईडीला सूत्रांनी दिली

हेही वाचाः- वेश्याव्यवसाय गुन्हा नाही! हायकोर्टाने केली ‘त्या’ तिघींची सुटका

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा