ही जीवघेणी स्टंटबाजी थांबता थांबेना...

ही जीवघेणी स्टंटबाजी थांबता थांबेना...
See all
मुंबई  -  

धावत्या रेल्वेच्या दरवाजात उभं राहून स्टंटबाजी करण्याच्या नादात आजवर अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र तरी देखील तरुणाईची ही जीवघेणी स्टंटबाजी थांबण्याचे काही नाव घेत नाही. असाच एक लोकलमधील स्टंटबाजीचा जीवघेणा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण दरवाज्यावर लटकून स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानेच काढत तो व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ पश्चिम रेल्वेने प्रवास करताना बनवल्याचे या प्रवाशाने सांगितले आहे.

1.12 च्या सुमार दादरवरून जाणाऱ्या ट्रेनमधला हा व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे हा तरुण एकटाच नव्हता तर त्याच्यासोबत त्याचे मित्र देखील असल्याची माहिती या प्रवाशाने दिली आहे.

[हे पण वाचा - या कुत्र्यालाही जिवाची भीती आहे, तर आपल्याला का नाही?]

रेल्वे प्रशासन विविध माध्यमातून जीवघेणी स्टंटबाजी करू नका असं आवाहन करत असतं. मात्र तरी देखील काही तरुण आपला जीव धोक्यात घालून हा खतरनाक स्टंट करतात आणि आपलं अमूल्य जीवन गमावतात. त्यामुळं आपलं आयुष्य हे खूप सुंदर आहे ते अशा स्टंटबाजीने गमावू नका असं आवाहन 'मुंबई लाइव्ह' तुम्हाला करतंय

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.