या कुत्र्यालाही जिवाची भीती आहे, तर आपल्याला का नाही?

Mumbai  -  

रेल्वे रुळ ओलांडू नये, स्टंटबाजी करू नये असं आवाहन अनेकदा रेल्वेकडून केलं जातं. मात्र तरीही रेल्वेच्या दरवाजात स्टंटबाजी करताना, रेल्वे रुळ ओलांडताना अनेक जणांनी आपले प्राण गमावलेत. मात्र हे कोणतंही आवाहन समजत नसतानाही बोरिवलीहून चर्चगेटला जाणाऱ्या एका लोकलमध्ये एक कुत्रा अत्यंत शिस्तीने महिला डब्यात चढला. विशेष म्हणजे माणसांप्रमाणे दरवाज्यात न उभं रहाता हा कुत्रा दारापासून लांबच उभा असल्याचं व्हिडिओमध्ये दिसेल. 

[हे पण वाचा - ही जीवघेणी स्टंटबाजी थांबता थांबेना...]

ट्रेन कोणत्या फलाटावर लागेल याचा देखील त्याने अंदाज घेतला. इतकेच नाही, तर जेव्हा त्याला कळलं की फलाट मागच्या बाजूला येणार आहे, तेव्हा तो मागच्या बाजूला शिस्तीत जाऊन दाराजवळ ऊभा राहिला. त्यानंतर जेव्हा ट्रेन थांबली तेव्हा कोणत्याही स्टंटबाजीशिवाय तो प्लॅटफॉर्मवर उतरला. एका मुक्या प्राण्याने कदाचित रोज रेल्वेमध्ये स्टंट करणाऱ्या स्टंटबाजांना चांगलाच संदेश दिलाय असंच म्हणावं लागेल.

Loading Comments