कफ परेडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरूणाची हत्या

 Mumbai
कफ परेडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरूणाची हत्या
कफ परेडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरूणाची हत्या
See all

कफ परेड - गणेशमूर्तीनगर इथं एका तरूणाची हत्या झाल्याची घटना रविवारी घडली आहे. जितेन हरी (25) असे मृत तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रविवारी संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास जितेन याच्यावर काही अज्ञातानं तलवार, चॉपर आणि रॉडने वार केले. तरुणाला जखमी अवस्थेत जीटी रुग्णालयात दाखल केले. पण दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी पाच अज्ञात व्यक्तींवर गुन्हा नोंदवला आहे. तर काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रश्मी जाधव यांनी सांगितले.

Loading Comments