सेल्फीच्या नादात तरुणी बुडाली

  Bandra west
  सेल्फीच्या नादात तरुणी बुडाली
  मुंबई  -  

  सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुणी बँड स्टँडच्या समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. मीनाक्षीप्रिया राजेश (21) असं या तरुणीच नाव असून, ती तामिळनाडूच्या मदुराईची राहणारी होती.

  उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबई बघण्यासाठी आलेली मीनाक्षीप्रिया आणि तिचे कुटुंबिय सोमवारी सकाळी मुंबई दर्शनासाठी बाहेर पडले. मुंबईतील काही ठिकाणं बघितल्यावर ते दुपारच्या सुमारास बँड स्टँडला पोहोचले. त्यावेळी मीनाक्षीप्रियला किल्ल्याजवळ सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. घरच्यांनी तिला तिकडे न जाण्याचा सल्ला दिला. पण ती सेल्फी काढण्यासाठी पाण्यात गेली आणि एका दगडावर उभी राहिली असता नियतीने तिच्यावर घाला घातला. अचानक जोराची लाट आली आणि मीनाक्षीप्रिया पाण्यात फेकली गेली. 

  भरतीची वेळ असल्याने समुद्र खवळलेला होता. बघता बघता मीनाक्षीप्रिया समुद्रात ओढली गेली. ती मदतीसाठी ओरडत होती. मात्र कुणीच काही करू शकलं नाही. अग्निशमन दल आणि पोलिसांना तात्काळ बोलावण्यात आले पण तोवर खूप उशिर झाला होता. काही तासांनी वांद्रे वरळी सागरी सेतूजवळ तिचा मृतदेह सापडला. 21 वर्षीय मीनाक्षीप्रिया इंजिनीयरिंगचे शिक्षण घेत होती.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.