COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

माॅडेलचे अश्लील व्हिडीओ काढून बदनामी करणाऱ्यास अटक

दोघे हैद्राबादला फिरायला गेलेे असताना अमितने तिला व्हिडीओ दाखवले. त्यावेळी तिने त्याचा मोबाइल तपासला असता मोबाइलमध्ये अमितचे अनेक व्हिडीओ विविध मुलींसोबत होते. त्यामुळे पीडीत तरूणी अमितला सोडून गेली. त्यानंतर अमित वारंवार तिला त्रास देऊ लागला.

माॅडेलचे अश्लील व्हिडीओ काढून बदनामी करणाऱ्यास अटक
SHARES

अंधेरीत रहात असलेल्या २७ वर्षीय माॅडेल तरूणीवर अत्याचार करून तिचे व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करणाऱ्या अमित अग्रवाल (३५) या तरुणाविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मागील एक वर्षापासून अमित तरुणीला व्हिडीओ सर्वत्र दाखवण्याची धमकी देेेत शरीरसुखाची मागणी करत होता. या प्रकरणी ओशिवरा पोलिस अधिक तपास करत आहे.


अश्लील व्हिडीओ काढले

मूळची उत्तरप्रदेशच्या लखनऊ परिसरात राहणारी पीडित तरुणी २०१५ मध्ये मुंबईत कामासाठी आली. सिरियल आणि सिनेमात छोटेे-मोठे रोल तिने केले आहेत. २०१८ मध्ये फेसबुकवर तिची ओळख अमितसोबत झाली. त्यानंतर ती जानेवारीत त्याला भेटली. लग्न करण्याचं आश्वासन दिल्याने तरुणी अमितसोबत रिलेशनशिपमध्ये होती. फेब्रुवारी महिन्यात तरुणीला अमितने आई-वडिलांना भेटवण्यासाठी घरी बोलावले. मात्र भेट न घडवता त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. त्यावेळी त्याने न कळत तिचे अश्लील व्हिडीओही काढले होते.


फेसबुक,  इन्स्टाग्रामवर व्हिडीओ 

दोघे हैद्राबादला फिरायला गेलेे असताना अमितने तिला व्हिडीओ दाखवले. त्यावेळी तिने त्याचा मोबाइल तपासला असता मोबाइलमध्ये अमितचे अनेक व्हिडीओ विविध मुलींसोबत होते. त्यामुळे पीडीत तरूणी अमितला सोडून गेली.  त्यानंतर अमित वारंवार तिला त्रास देऊ लागला. त्यावेळी त्याने तरुणीचे अश्लील व्हिडिओही मित्रांना पाठवत तिचा बदनामी केली. त्यामुळे तरूणी कायमची मुंबई सोडून लखनऊला गेली. नोव्हेबर २०१९ मध्ये तरुणी लग्न करून पुन्हा मुंबईत आल्याची माहिती अमितला कळाल्यानंतर त्याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तिचे अश्लील व्हिडीओ शेेेअर केले. या त्रासाला कंटाळून तरुणीने अखेर ओशिवरा पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंदवला.हेही वाचा -

परदेशी तरुणाला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक

स्टंटबाजांचा पुन्हा मुंबईच्या रस्त्यांवर धुमाकूळ; ११ दुचाकी जप्त
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा