SHARE

दहिसर - चिमुरडीचा विनयभंग केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे. पीडित मुलगी दहिसर (पू) शांतीनगरमध्ये राहते. शनिवारी संध्याकाळी आठ वाजले, तरी मुलगी घरी आली नाही म्हणून आईनं शोधाशोध सुरू केली. त्यावेळी जवळच एका घरासमोर मुलीची चप्पल आढळल्यानंतर आईनं दार ठोठावलं. मात्र कुणी दार न उघडल्यानं तिनं आरडाओरड केली. त्यामुळं जमाव एकत्रित झाला. खूप वेळानंतर ते दार उघडलं. त्यावेळी मुलगी पलंगाखाली होती आणि तिच्या तोंडावर पट्टी बांधलेली होती. हे पाहताच तिथे जमलेल्यांनी यासंदर्भाची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांनी आरोपी अब्दुल रशीदविरोधात 354,323,342,509 कलमांनुसार आणि पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या