केईएम रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या


केईएम रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या
SHARES

मंत्रालय परिसरात तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता आजारपणाला कंटाळून एका रुग्णाने परळच्या केईएम रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


का केली आत्महत्या? 

नायगावच्या बीडीडी १९ मध्ये राहणारे सुरदास रामचंद्र गांधी (३९) हे अविवाहित आहेत. खांद्याला गंभीर जखम झाल्यामुळे त्यांच्यावर केईएम रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. मात्र आजार बरा होत नसल्याने कंटाळून सुरदास यांनी केईएम रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, अपमृत्यूची नोंद केली. रुग्णालय प्रशासनाने सुरदासचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या बातमीला केईएमचे अधिष्ठाता अविनाश सुपे यांनी दुजोरा दिला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा