साहसी चित्रीकरण करायला गेला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला!

काही तरी चॅलेंजिग करण्याचं साहस एखाद्याला कोणत्याही थरावर नेऊन ठेवते. मुंबईतल्या एका तरूणाला त्याचं एक भलतंच साहस महागात पडलं आहे. अँड्रयू बेंजामिन शिम्या हा अतिशय हुशार विद्यार्थी सोमवारी रात्री बंद असलेल्या कुलाब्यातील मॅजेस्टिक आमदार निवासस्थानात गेला होता.

साहसी चित्रीकरण करायला गेला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला!
SHARES

काही तरी चॅलेंजिग करण्याचं साहस एखाद्याला कोणत्याही थरावर नेऊन ठेवते. मुंबईतल्या एका तरूणाला त्याचं एक भलतंच साहस महागात पडलं आहे. अँड्रयू बेंजामिन शिम्या हा अतिशय हुशार विद्यार्थी सोमवारी रात्री बंद असलेल्या कुलाब्यातील मॅजेस्टिक आमदार निवासस्थानात गेला होता. या भितीदायक इमारतींमध्ये जाऊन आपण किती शूर आहोत, याचे चित्रीकरण करत होता. मात्र सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केल्यानंतर त्याला चांगलाच घाम फुटला. त्याचा हेतू चुकीचा नसल्याने पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करत त्याला सोडून दिलं!


यूट्यूबवरच्या व्हिडिओनं केली गोची!

मूळचा बंगळुरूचा रहिवासी असलेला अँड्रयू बेंजामिन शिम्या हा त्याच्या मित्रासोबत पेडर रोड येथील अपार्टमेंटमध्ये राहतो. शिक्षणासाठी आलेल्या अँड्र्यूला माध्यमिक विद्यालयात ९४ टक्के पडले आहेत. पुढील शिक्षणासाठी तो मुंबईत आला होता. यूट्युबवरील भितीदायक स्थळांना एकटे भेट देऊन आपले साहस दाखवणारे अनेक व्हिडिओ त्याने पाहिले होते. आपला देखील व्हिडिओ अशा प्रकारे बनवून यूट्यूबवर टाकण्याची त्याची इच्छा होती. त्यामुळेच घराजवळील बंद असलेल्या मॅजेस्टिक आमदार निवासस्थानावर त्याची येता जाता नजर असायची.


सुरक्षा रक्षकांना पाहून अँड्र्यू घाबरला...

दरम्यान, सोमवारी रात्री ११च्या सुमारास बंद असलेल्या आमदार निवासाच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षक नसल्याचे पाहून अँड्र्यू मागून आत शिरला. अंधारात मोबाइलद्वारे बंद असलेल्या दरवाजांच्या कड्या तोडून त्याने स्वचःचे चित्रीकरण सुरू केले. बंद असलेल्या निवासस्थानातून येणाऱ्या आवाजामुळे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सवालदीन पिंजारी यांचे त्या ठिकाणी लक्ष वेधले. त्यावेळी निवासस्थानी कुणीतरी चोरी करण्याच्या हेतून शिरल्याचे समजून मदतीसाठी पिंजारी यांनी सुरक्षा रक्षक जितेंद्र कदम यांना बोलावून घेतले. सुरक्षा रक्षक आत जात असताना अंधारात ते कोणत्या तरी वस्तूला धडकले. त्यामुळे अँड्‌यूला त्याची कल्पना आल्यानंतर तो घाबरून पळू लागला.


...नाहीतर अँड्र्यूचं काही खरं नव्हतं!

अखेर सुरक्षा रक्षकांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता मुंबईतील निर्जन, भितीदायक स्थळांना भेट देऊन स्वतःचे साहसी चित्रीकरण करून युट्युबवर अपलोड करायचे असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी विश्वास ठेवावा यासाठी त्याने यूट्यूबवरील तसे इतर व्हिडिओही दाखवले. पोलिस अधिकाऱ्यांसमोर भेदरलेल्या अँड्रयूला त्याच्या साहसाची कल्पना आलीच असावी! मात्र कोणाच्याही मालकीच्या वस्तूत प्रवेश करण्यापूर्वी त्याची परवानगी घेणे आवश्‍यक असते. साहसी कृत्याच्या नादात आपण केलेली चूक अँड्रयूला लक्षात आली. त्याचा हेतू चुकीचा नसल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला ताकीद देत, त्याच्यावर कठोर कारवाई न करता, अदखलपात्र गुन्हा नोंदवून त्याला सोडून दिले.



हेही वाचा

स्वच्छतागृहही असुरक्षित, वाकोल्यात तरूणीचं अश्लील चित्रीकरण करणारा अटकेत


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा