सहा महिन्यांपूर्वी लांबवलेली सोनसाखळी मिळाली


SHARE

कुर्ला - हार्बर मार्गावरील कुर्ला फलाट क्रमांक 7 वरून डाऊन पनवेल लोकलने प्रवास करणाऱ्या प्रतीक सालीयन यांची सहा महिन्यांपूर्वी दोन चोरांनी सोनसाखळी लांबवली होती. हे दोन चोर सोमवारी वडाळा लोहमार्ग पोलिसांच्या हाती लागले. त्यांनी या वेळी यापूर्वी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून सोनसाखळी हस्तगत करण्यात आली. तर त्यानंतर प्रतीक सालीयन यांना शहानिशा करून सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतिश पवार यांनी दिली. या गुन्ह्यात आरोपी अशोक ठाकूर आणि रामचंद्र अधिकारी क्रांती मैदान यांना अटक करण्यात आली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या