वाढदिवसाचा बॅनर फाडल्याने साकीनाकामध्ये तरुणाची हत्या


वाढदिवसाचा बॅनर फाडल्याने साकीनाकामध्ये तरुणाची हत्या
SHARES

केवळ वाढदिवसाचा बॅनर फाडला म्हणून एका तरूणाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार मुंबईच्या साकीनाका परिसरात घडला आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आकाश लांडगे असं हत्या करण्यात आलेल्या 23 वर्षीय तरूणाचं नाव आहे. पोलिसांनी प्रथमेश उर्फ बारक्या शेट्टी(28) आणि नितीन ढोबळे(26) या दोघांना अटक केली आहे.


काय झालं होतं?

मंगळवारी प्रल्हाद शेट्टी नावाच्या केबल व्यावसायिकाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त परेरा वाडी आणि इतरत्र शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते. त्याच परिसरात राहणारा आकाश लांडगे हा साकीनाका पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचा शेट्टी बंधूंशी छत्तीसचा आकडा होता. त्यामुळे पूर्व वैमनस्यातून आकाशने प्रल्हाद शेट्टीचे शुभेच्छांचे बॅनर फाडले.

मात्र, ही गोष्ट समजताच प्रल्हाद शेट्टीचा भाऊ खवळला. सोमवारी रात्री प्रथमेश शेट्टी आणि त्याच्या साथीदाराने आकाशला गाठले आणि त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या आकाशला परेरा वाडीत टाकून दोघांनी तिथून पाळ काढला.

ही घटना समजताच साकीनाका पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी आकाशला तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेले, जिथे आकाशचा मृत्यू झाला. आकाशला गुप्तांगावर देखील जबर मार लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


तडीपार आकाश शेट्टी

हत्येचा गुन्हा दाखल होताच साकीनाका पोलिसांनी तात्काळ प्रथमेश शेट्टी आणि नितीन ढोबळे या दोघांना अटक केली. गुरुवारी दोघांना कोर्टात हजार केलं जाईल. आकाश शेट्टीला याआधीच तडीपार करण्यात आले असून नेमका आकाश परेरा वाडीत का आला होता? याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.



हेही वाचा

'अशा' गेमपासून सावध रहा!, नाहीतर असं तुमच्यासोबतही घडू शकतं


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा