Advertisement

महाराष्ट्रातील 10 ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा होणार विकास

या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्था सुधारण्याचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रातील 10 ऐतिहासिक पर्यटन  स्थळांचा होणार विकास
(Representational Image)
SHARES

महाराष्ट्र (maharashtra) सरकार राज्यातील दहा महत्त्वाच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन क्षेत्रांचा विकास करणार आहेत. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पांना गेल्या वर्षीच मान्यता मिळाली होती. मात्र, आवश्यक निधीचे वाटप करण्यात आले नव्हते. 

या विकास कामांसाठी 1,213.44 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. प्रशासनाने 21 जून रोजी आवश्यक ते आदेश जारी केले. या योजनांची तातडीने अंमलबजावणी केली जाईल. या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्था सुधारण्याचे उद्दिष्ट आहे.

मंजूर केलेली ठिकाणे आणि वाटप केलेले बजेट खालीलप्रमाणे आहेतः

१) औंधा नागनाथ मंदीर, हिंगोली -  15.21 कोटी

२) टायगर पॉइंट आणि लायन पॉइंट, मावळ - 333.56 कोटी

३) मालोजीराजे गढी आणि हजरत चांदशाह बाबा दर्ग,  - 37.28 कोटी

४) हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थान, खेड (पुणे) - 102.48 कोटी

५) राजमाता सईबाई स्मारक, वेल्हे - 29.73कोटी

६) संताजी जगनाडे महाराज समाधी सुशोभीकरण - 66.11कोटी

७) सप्तश्रुंगी देवी तीर्थयात्रा, नाशिक - 81.86 कोटी

८) पथरी तीर्थयात्रा -  91.80 कोटी

९) प्रतापगड किल्ला संवर्धन आणि कोयना नदी पर्यटन, सातारा - 381.56 कोटी

१०) पंढरपूर मंदीर - 73.85 कोटी


सत्ताधारी महायुती आघाडी राज्यातील निवडणुकीच्या प्रचारात या विकास योजनांवर अधिक भर देऊ शकते. हे प्रकल्प राबवल्यास मतदारांचा देखील सरकारला (Government) अधिक पाठिंबा मिळेल.हेही वाचा 

काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार

नवी मुंबईत झाडांच्या संख्येत 8 वर्षांत 78% वाढ

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा