शिवकालीन शस्त्रांचे देवनार येथे प्रदर्शन

 Deonar
शिवकालीन शस्त्रांचे देवनार येथे प्रदर्शन

सध्या शाळांना सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची ओळख व्हावी या उद्देशाने तसेच शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने गेल्या तीन दिवसांपासून शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन देवनार कॉलनीतील सभागृहात भरवण्यात आले आहे. गुरुवारी या प्रदर्शनाचा शेवठचा दिवस असणार आहे. यामध्ये शिवाजी महाराज यांनी लढाई केलेल्या अनेक तलवारी, भाल, दांड पट्टा अशा शस्त्रांचा समावेश आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांनी देखील या प्रदर्शनाला भेट द्यावी, अशी विनंती आयोजक हेमंत भास्कर यांनी केली आहे. मानखुर्द-शिवाजी नगर भाजपाच्या वतीने हे प्रदर्शन याठिकणी भरवण्यात आले आहे.

Loading Comments