Advertisement

'या' घरांत होते 'नात्यांची' घटस्थापना


'या' घरांत होते 'नात्यांची' घटस्थापना
SHARES

नवरात्र म्हटलं की डोळ्यासमोर येते ती घटस्थापना. घरोघरी वेगवेळ्या पद्धतीने घटस्थापना केली जाते. कुठे देवीच्या मूर्तींची स्थापना होते, तर कुठे कुलदेवतेचे घट बसवले जातात. पण एक असं घर आहे, जिथे नात्यांची घटस्थापना होते.. आश्चर्य वाटलं ना! पण हे खरंय.. ही आगळी वेगळी घटस्थापना होते ठाण्याच्या शेटे कुटुंबीयांच्या घरी.

ठाणे जिल्ह्यातील शेटे परिवाराची खासियतच ही आहे की, हे संपूर्ण कुटुंब आजही एकत्र आहे. यांचे कुळदैवतही एकच आहेत. खापर पणजोबा, पणजोबा, आजोबापासूनच चालत असलेली 'घटस्थापने'ची पद्धत नव्या पिढीने आजही मोठ्या आनंदानं जपलेली आहे. हळूहळू कुटूंबाचा विस्तार मोठा झाला. मात्र परंपरेत कुठेही खंड पडला नाही. आजही नवरात्रीत कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र येतात..

शेटे कुटुंबात घटस्थापनेची वेगळी पद्धत आहे. प्रत्येक वर्षी कुटुंबातल्या एका सदस्याकडे कुळदैवताची प्रतिष्ठापना केली जाते. ज्या घरी कुळदैवतांची प्रतिष्ठापना होते. त्या घरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि पाचव्या दिवशी म्हणजेच फुलोऱ्याच्या दिवशी संपूर्ण कुटुंबातील सदस्य एकत्र येतात. संपूर्ण कुटुंब एकत्र कुटुंब असल्याने सर्वजण मिळून कूळदैवतेची सेवा करतात. जवळपास १७ वर्षांनी एका घराला कुळदेवतेची सेवा करण्याची  संधी मिळते.



शेटे कुटुंबात कुळदैवतांना निरोप देण्याचीही एक वेगळी पद्धत आहे. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुळदैेवतांना निरोप देताना एक छोटी दिंंडी काढली जाते. आणि कुटुंबातील एका सदस्याकडून देव कुटुंबातील दुसऱ्या सदस्याकडे जातात आणि परंपरा अखंड पुढे चालत राहते.



हेही वाचा -

नवरात्रोत्सव विशेष: नवरात्रीत 'या' ९ मंदिरांना नक्की भेट द्या!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा