Advertisement

मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतूनही उपलब्ध

हायकोर्टाच्या अधिकृत वेबसाईटवर एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतूनही उपलब्ध
SHARES

मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतूनही उपलब्ध होणार आहेत. बुधवारपासून हायकोर्टानं आपल्या वेबााईटवर निकाल मराठीतूनही अपलोड करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी हायकोर्टाच्या अधिकृत वेबसाईटवर एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जिथं नागरीकांना हायकोर्टानं दिलेले निकाल मराठीतूनही वाचता येतील. मात्र सध्या हा पर्याय काही ठराविक निकालांकरताच उपलब्ध असल्यानं तो 'निवडक निर्णय' या शिर्षकाखाली तयार करण्यात आला आहे. बाकी हायकोर्टाचे सर्व निकाल हे नेहमीप्रमाणे इंग्रजी भाषेत उपलब्ध असतील. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या मातृभाषेतून निकाल समजणं सोप्प जाईल हा उद्देश आहे.

पहिल्या दिवशी यात 20 फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती धीरज सिंह ठाकूर आणि न्यायमूर्ती कमला खाता, न्यायमूर्ती धीरज सिंह ठाकूर आणि न्यायमूर्ती अभय अहुजा आणि न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठानं दिलेले नुकतेच निकाल मराठीतून उपलब्ध करण्यात आले आहेत.

या निकालांवर खासकरून लिहिण्यात आलंय, की मराठीतील या निकालांचा वापर मर्यादीत स्वरूपाचा असून नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत निकाल हे त्यांना ते योग्यरितीनं समजावेत यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे भाषांतर करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणाही सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी केली होती. न्यायमूर्ती अभय ओका यांच्याकडे या समितीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले होते की ही समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे हिंदी तसेच गुजराती, ओरिया आणि तमिळ भाषांमध्ये भाषांतर करण्याबाबत खातरजमा करेल. न्यायालयीन निकालाच्या भाषांतराचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी 25 जानेवारी ही न्यायालयांशी निगडीत या नव्या सेवेचं लोकार्पण केलं होतं. ज्यातनं सर्वोच्च न्यायालयातील निकालही देशातील विविध स्थानिक भाषांत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सेवेतून सध्यातरी 2 हजार 900 विविध हे मराठीसह अन्य भारतीय भाषांतून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित केले जातील, असं सांगितलं होतं. सरन्यायाधीशांच्या या घोषणेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वागत केले. तर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल इंग्रजीत आहेत आणि 99.9 टक्के लोकांना ते समजू शकत नाहीत, असं सरन्यायाधीश चंद्रचूड काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते.



हेही वाचा

मुंबईत 5 ते 7 मार्च दरम्यान अवकाळी पाऊस, तापमानात होणार वाढ

स्थायी पर्यायी निवास करारावर 100 पेक्षा जास्त मुद्रांक शुल्क नाही: मुंबई उच्च न्यायालय

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा