अभ्युदयनगरात चिमुकल्यांची दिंडी!

Kalachauki
अभ्युदयनगरात चिमुकल्यांची दिंडी!
अभ्युदयनगरात चिमुकल्यांची दिंडी!
अभ्युदयनगरात चिमुकल्यांची दिंडी!
अभ्युदयनगरात चिमुकल्यांची दिंडी!
See all
मुंबई  -  

विठू माऊली तू माऊली जगाची... विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला... असा विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीचे औचित्य साधून सोमवारी शिवाजी विद्यालयाच्या हजारो चिमुकल्या वारकऱ्यांनी अभ्युदयनगर परिसरात दिंडी काढली. चिमुकल्यांचा वारकरी पेहराव येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध ठिकाणच्या विठ्ठल - रखुमाई मंदिरातून भजन, किर्तनासह दिंड्या निघतात. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरेचे महत्व विद्यार्थ्यांनाही कळावे, या उद्देशाने गेल्या दहा वर्षांपासून काळाचौकी येथील शिवाजी विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात येते.यंदाही ज्युनियर केजी पासून इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना घेऊन शाळेने अभ्युदयनगर परिसरात दिंडी काढली होती. विदयार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करीत संपूर्ण परिसर दणाणून टाकला.


त्याचबरोबर 'झाडे लावा, झाडे जगवा', 'व्यसन सोडा निरोगी आयुष्य जगा', 'पाण्याचा अपव्यय टाळा', असे सामाजिक संदेश देत समाजप्रबोधन केले. विठ्ठल - रखुमाईचा पेहेराव केलेले विद्यार्थी या दिंडीचे मुख्य आकर्षण होते. दिंडी काळाचौकी पोलीस ठाणे येथे येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप उगले, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांच्या दिंडीचे मनोभावे स्वागत केले.हेही वाचा

मुंबईतलं 'पंढरपूर'!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.