कुरारगावात रंगला दीपोत्सव

 Mumbai
कुरारगावात रंगला दीपोत्सव
कुरारगावात रंगला दीपोत्सव
कुरारगावात रंगला दीपोत्सव
कुरारगावात रंगला दीपोत्सव
कुरारगावात रंगला दीपोत्सव
See all

कुरारगाव - कुरारगाव ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने रविवारी कुरार गावातील पारेख उद्यानात दीपोत्सव आणि दिवाळी पहाट कार्यक्रम झाला. दरवर्षीप्रमाणेच कुरारगावातील ज्येष्ठ नागरिकांनी पहाटगीतं ऐकण्यासाठी गर्दी केली होती. सुमधुर भक्तीगीतं, भावगीतं, देशभक्तीपर गीतांनी दिवाळी पहाट कार्यक्रमलाला बहार आली. या वेळी कुरारगावातील ज्येष्ठ गायक आणि संगीतकारांनी विशेष कलेचा नजराणा सादर केला. कार्यक्रम नियोजनबद्ध होण्यासाठी कुरारगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शांताराम पेडणेकर, सचिव एकनाथ हळदणकर, कार्याध्यक्ष रत्नाकर पनवेलकर आणि इतर ज्येष्ठ सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Loading Comments