Advertisement

'असं' करा दिवाळीच्या अभ्यासाचं प्लानिंग

दिवाळीत भलेही शाळांना सुट्टी असली, तरी विद्यार्थ्यांना 'दिवाळीचा अभ्यास' दिला जातो. या अभ्यासाचं योग्य नियोजन केलं, तर हा गृहपाठ वेळेत पूर्ण होईल शिवाय उरलेल्या वेळेत तुम्हाला मौजमजाही करता येईल.

'असं' करा दिवाळीच्या अभ्यासाचं प्लानिंग
SHARES

हल्ली बहुतेक शाळांमध्ये पारंपरिक 'गृहपाठ' देण्याऐवजी प्रयोगशीलतेवर आधारीत उपक्रम विद्यार्थ्यांना दिले जतात. त्यात निबंध लिहिणं, दिवाळी अंकाचं वाचन करणं, एखाद्या प्रकल्पाची माहिती देणं, मुलाखत घेणं अशा स्वरूपाच्या अभ्यासाचा समावेश असतो. सुट्टीतील प्रत्येक दिवसासाठी स्वतंत्र अभ्यासाचा टास्क देण्यात येतो. मात्र विद्यार्थी सुट्टी लागताच मज्जा सुरू करतात आणि शेवटच्या काही दिवसांत दिवाळीचा अभ्यास उरकतात. पण योग्य प्लानिंग केल्यास तुम्हाला गृहपाठ वेळेत पूर्ण करता येईल शिवाय उरलेल्या वेळेत मौजमजाही करता येईल.


वेळेचं नियोजन आवश्यक

दिवाळीचा अभ्यास करताना वेळेचं नियोजन करा. दिवाळीच्या दिवसांत दररोज एक किंवा दोन तास गृहपाठासाठी दिल्यास दिवाळीचा अभ्यास कधी पूर्ण झाला हे तुम्हालाही कळणार नाही. अशा नियोजनामुळे तुमचा अभ्यास दिवाळीची सुट्टी संपायच्या आधी पूर्ण होईल आणि सुट्टीचे शेवटचे दिवस तुम्हाला भरपूर मज्जा करता येईल.


क्रिएटीव्हीटीला चालना द्या...

दिवाळीची अभ्यास पूर्ण करण्याबरोबरच अनेकदा शाळांमधून विविध वस्तू तयार करायला सांगतात. आयत्यावेळी या वस्तू तयार करायला घेतल्या की धांदल उडते. त्यामुळे दिवाळीचा अभ्यास करताना वस्तू तयार करण्यावर आधी भर द्या.


मनसोक्त चित्र काढा

तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा अाला की चित्र रंगवणं, चित्र काढणं अशी कामे करा, जेणेकरून दिवाळीचा अभ्यासही पूर्ण होईल आणि वेळही छान जाईल.


आवडता विषय पटकन संपवा

निबंध लिहिणं, चित्र काढणं, पाढे लिहिणं अशा आवडीच्या विषयाचा अभ्यास पटकन संपवा. त्यानंतर दररोज हळूहळू नावडत्या विषयाचा अभ्यास पूर्ण करा.


छंदालाही जोपासा

दिवाळीच्या सुट्टीत अभ्यासाबरोबरच छंद जोपासण्यासाठीही वेळ द्या. नृत्य करणं, चित्र काढणं, आवडती पुस्तकं वाचणं अशा आवडी निवडी जोपासण्यावर भर द्या.



हेही वाचा-

सोशल मीडियामुळे सणांमधून भेटकार्ड हद्दपार!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा