Advertisement

10th, 12th Exam : दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, आता ‘या’ महिन्यात होणार परीक्षा

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांबद्दल महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

10th, 12th Exam : दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, आता ‘या’ महिन्यात होणार परीक्षा
SHARES

राज्यातील कोरोनाच्या भयावह स्थितीमुळे दहावी (SSC exam) आणि बारावीच्या (HSC Exam) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात ट्विट करून ही माहिती दिली.

आता दहावीची परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहे. तर बारावीची परीक्षा मेच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या जातील. शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे सध्या पालक आणि विद्यार्थ्यांची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ते म्हणाले होते की, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता परिस्थीती अत्यंत बिकट होत चालली आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शहर व ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढलेले दिसत आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेणे हे लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखे होईल.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाचला आहे. यासाठी दहावी (SSC exam) आणि बारावीच्या (HSC exam) मुलांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करावं, अशी मागणी देखील पालक संघटनांकडून करण्यात आली होती. या पालक संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पत्र पाठवून तशी विनंतीही केली होती.


हेही वाचा : मुंबई विद्यापीठ परीक्षेची कागदपत्रे इ-मेलवर स्वीकारणार


इंडिया वाईड पॅरेंटस असोसिएशननं पंतप्रधान मोदींना हे पत्र पाठवलं आहे. केंद्र सरकारने कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन दहावी आणि बारावीसह विद्यापीठांच्या परीक्षा या अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण जाहीर करावं, असं या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.

दहावी बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्यादृष्टीने अत्यंत महत्वाची असते. पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे बारावीची परीक्षा २१ एप्रिल तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ११ एप्रिलची परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलली आहे. पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या त्यानंतर ९ वी आणि ११ वीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे आणि पालक तसेच बहुसंख्य विद्यार्थ्यांकडूनही बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर परीक्षेसंदर्भात निर्णय घेऊन पालक, विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.



हेही वाचा - एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा