Advertisement

Maharashtra Budget 2022 : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Maharashtra Budget 2022 : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी
SHARES

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसंच राज्यातल्या महापुरुषांच्या मूळ गावातील शाळांना १ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.

महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२२-२३ हा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात प्रकल्पांसाठी निधींची तरतूद केली जात आहे.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गुरूवारी विधिमंडळात २०२१-२०२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे.

राज्याच्या कृषी तसेच कृषीपुरक क्षेत्रातही ४.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. आता या अर्थसंकल्पातून राज्यातल्या सामान्य माणसाला काय मिळणार याकडे संपूर्ण राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा