Advertisement

दहावी, बारावीच्या रिपीटर विद्यार्थ्यांची परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल,मे महिन्यात इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. यावेळी रिपीटर आणि श्रेणीसुधारसाठी पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यावेळी परीक्षा देता येईल.

दहावी, बारावीच्या रिपीटर विद्यार्थ्यांची परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर
SHARES

कोरोनाकाळात अभ्यासक्रम पूर्ण न शिकवता आल्यामुळे राज्य सरकारने २५ टक्के अभ्यासक्रम कपातीचा निर्णय घेतला आहे. मात्र, १० वी आणि १२ वीच्या लेखी परीक्षेला बसणाऱ्या रिपीटर आणि श्रेणीसुधारसाठी पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा द्यावी लागणार आहे. 

दहावी-बारावीच्या परीक्षांना नियमित व माेजके विषय घेऊन बसणारे विद्यार्थी २५ टक्के कपातीचा लाभ घेऊन परीक्षा देऊ शकतील. तर रिपीटर विद्यार्थ्यांना १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा द्यावी लागणार असल्याचं राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केलं आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल,मे महिन्यात इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. यावेळी रिपीटर आणि श्रेणीसुधारसाठी पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यावेळी परीक्षा देता येईल. मात्र, या विद्यार्थ्यांना २५ टक्के अभ्यासक्रम कपातीचा लाभ दिला जाणार नसल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. या विद्यार्थ्यांना १०० टक्के म्हणजेच पूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा द्यावी लागणार आहे.

लाॅकडाऊनमुळे यंदा मार्च २०२० पासून राज्यातील ऑफलाईन शिक्षण बंद झाले. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी या अभ्यासातही विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा  करावा लागत आहे. ऑनलाइन अभ्यास उशिराने सुरू   झाल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून दहावी, बारावी बोर्डांच्या परीक्षा जाहीर करण्यात आल्या आहेत.  त्यामुळे पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेण्यात येऊ नयेत अशी मागणी विद्यार्थी तसेच पालकांकडून सातत्याने करण्यात येत हाेती.हेही वाचा -

मुंबईत सीएनजी, पीएनजी गॅस महागला

लोकलचं सध्याचं वेळापत्रक १५ दिवसांनंतर बदलणार?Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा