Advertisement

दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. दहावी, बारावीची परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार
SHARES

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. कोरोनाचं संकट वाढल्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता ऑफलाईन होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड सध्या अनुकूल नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. दहावी, बारावीची परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यावेळी दहावी, बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष घेण्याचा पर्याय असू शकतो का? परीक्षा ऑनलाईन घेता येतील का? अशी चर्चा करण्यात आली. शिक्षण विभागाने सांगितलं की, दहावी, बारावीच्या परीक्षांची तयारी पूर्ण झाली आहे. ऑनलाईन परीक्षा घेतली, तर ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीचा विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह आहे. 

राज्यात दहावीचे १६ लाख तर बारावीचे १४ लाख विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर केलं. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होईल. बारावीची बोर्डाची परीक्षा २३ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक देण्यात आलं आहे. १० वीच्या परिक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि १२ वी च्या परिक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागणार आहे.


हेही वाचा -

बापरे! २ दिवसांत मुंबईतील सील इमारतींची संख्या 'इतकी'

मास्कविना फिरणाऱ्या 'इतक्या' जणांवर कारवाई

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा