Advertisement

ज्युनिअर सायन्स आॅलिम्पियाडमध्ये मुंबईकर सुवर्णनाथला सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स आॅलिम्पियाडमध्ये भारतातील १५ वर्षांखालील चार विद्यार्थ्यांनी ४ सुवर्ण पदक आणि २ रजत पदकांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्यांमध्ये भांडुपमधील सुवर्णनाथ राॅय या दहावी इयत्तेतील विद्यार्थ्याचाही समावेश आहे.

ज्युनिअर सायन्स आॅलिम्पियाडमध्ये मुंबईकर सुवर्णनाथला सुवर्णपदक
SHARES

आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स आॅलिम्पियाडमध्ये भारतातील १५ वर्षांखालील चार विद्यार्थ्यांनी ४ सुवर्ण पदक आणि २ रजत पदकांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा सुवर्णनाथ राॅय हा इयत्ता दहावीतला विद्यार्थी मुंबईतल्या भांडुप इथला रहिवासी आहे.


स्पर्धेचं स्वरूप कसं?

आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स आॅलिम्पियाड ही स्पर्धा यंदा १२ डिसेंबर रोजी नेदरलॅंड्समध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण ५० देश सहभागी झाले होते. यंदाच्या स्पर्धेची मुख्य थीम 'जलसंवर्धन' अशी होती. या स्पर्धेसाठी भारतातील विविध राज्यांतून ६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या सहाच्या सहा विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरील विश्वास सार्थ ठरवत पदकांची लूट केली आहे. मुदिता गोयल, अखिल जैन, सुवर्णनाथ राॅय, कुणाल सामंत यांना सुवर्णपदक, तर नियती मेहता आणि आदर्शराज सहा या दोन विद्यार्थ्यांना रजत पदक मिळाली आहेत. या सगळ्यांनी अॅलन करिअर इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण घेतलं होतं.


या स्पर्धेच्या पाच पायऱ्या असतात. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राशी संबंधित ज्ञानावर आधारित अशी ही स्पर्धा असते. ज्युनियर गटात १५ वर्षांखालील विद्यार्थी यांत सहभागी होतात. सहसा आठवीपासूनच विद्यार्थी या स्पर्धेची तयारी सुरु करतात.

- प्रा. हरप्रीत सिंह, अॅलन करिअर इन्स्टिट्यूट


गेल्या तीन वर्षांपासून मी या आॅलिम्पियाड स्पर्धेची तयारी करत होतो. देशाच्या वतीने जेव्हा मी सुवर्णपदक स्वीकारलं तेव्हा तो माझ्या आयुष्यातला सर्वाधिक आनंदाचा क्षण होता. आजवर आॅलिम्पियाड किंवा इतर स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रातील तसंच दक्षिण भारतातील विद्यार्थ्यांना राजस्थानच्या कोटा येथे प्रशिक्षणासाठी जावं लागायचं. मात्र आता मुंबईतच हे मार्गदर्शन उपलब्ध झाल्यामुळे मला कोटाला न जाता मुंबईत राहूनच अभ्यास करता आला.

- सुवर्णनाथ राय, विद्यार्थी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा