Advertisement

अकरावीची प्रवेश प्रक्रिया तूर्त ऑनलाईनच- वर्षा गायकवाड

कोरोनाची परिस्थिती पाहून पुढील वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन करावी किंवा कसे याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया तूर्त ऑनलाईनच- वर्षा गायकवाड
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्यात इयत्ता अकरावीसाठीची प्रवेश प्रक्रिया तूर्त ऑनलाईनच आहे. यापुढील काळातही कोरोनाची परिस्थिती पाहून पुढील वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन करावी किंवा कसे याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी विधानपरिषदेत दिली. 

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याबाबत  विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

शासनाने गुणवत्ता व पारदर्शकतेच्या आधारावर ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली. कोरोनामुळे प्रवेश व शुल्क ऑनलाइन घेण्यात आले. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये इतर भागातील विद्यार्थीही प्रवेश घेत असतात व काही विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सला जात असल्याने काही जागा रिक्त राहतात. परंतु या जागा रिक्त राहू नये ही शासनाची भूमिका आहे, अशी माहितीही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य विक्रम काळे, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा- शिक्षण विभागाबाबत माहिती नसल्यास वर्षा गायकवाडांनी राजीनामा द्यावा - संजयराव तायडे पाटील

सोबतच बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९  अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने उच्च प्राथमिक म्हणजेच सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या पात्रतेमध्ये  बदल केला आहे. त्यानुसार शासनाने १३ ऑक्टोबर २०१६ रोजी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी अशा सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील प्राथमिक पदवीधर शिक्षक व विशेष शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबत सदस्य कपिल पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या विधानपरिषदेत बोलत होत्या. यासंदर्भात आमदार कपिल पाटील यांच्यासमवेत लवकरच बैठक आयोजित करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

(11th grade admission process will continue online in maharashtra says varsha gaikwad)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा