Advertisement

एमबीबीएसच्या परीक्षा ऑफलाईनच होणार

परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे.

एमबीबीएसच्या परीक्षा ऑफलाईनच होणार
SHARES

एमबीबीएस अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. 

राज्यातील अनेक परीक्षा केंद्र, महाविद्यालयांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने एमबीबीएसच्या परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नाही.पुढील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुद्धा ऑफलाईन घेतल्या जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत.या पार्श्वभूमीवर 8 मार्चपासून एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षेला सुरुवात होत आहे. कोरोनाचा विळखा वाढत असल्याने ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी केली होती.  

ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली किंवा ज्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षण दिसतील अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आयसोलेशन रूमची वेगळी व्यवस्था प्रत्येक परीक्षा केंद्रावर केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी दिली आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा