Advertisement

मेडिकलच्या एनअारअायच्या ९० टक्के जागा रिक्त

महाराष्ट्रातही वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असलेल्या जागापैंकी २४८ जागा रिक्त अाहेत. यातील २४३ जागा खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील अाहेत. तर या रिक्त जागांपैकी २१७ जागा ह्या अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांच्या (एनअारअाय) असल्याचं समोर अालं अाहे.

मेडिकलच्या एनअारअायच्या ९० टक्के जागा रिक्त
SHARES

देशात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ६६ हजार जागांसाठी तब्बल १३ लाख विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पात्रता अाणि प्रवेश परीक्षा (नीट) दिली अाहे. मात्र, वैद्यकीय प्रवेशाच्या ३ फेऱ्या होऊनही अनेक जागा रिक्त असल्याचं समोर अालं अाहे. महाराष्ट्रातही वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असलेल्या जागापैंकी २४८ जागा रिक्त अाहेत. यातील २४३ जागा खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील अाहेत. तर अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जागांपैकी तब्बल ९० टक्के जागा रिक्त असल्याचे अाकडेवारीतून समोर अालं अाहे. 


अवघ्या ८ जागा भरल्या

 महाराष्ट्रातील रिक्त जागांमध्ये बहुतांशी जागा अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी असल्याचं दिसून येत अाहे. यातील २१७ जागा ह्या अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांच्या (एनअारअाय) असल्याचे एमएच-सीईटी सेलने दिलेल्या अाकडेवारीतून समोर अालं अाहे. अनिवासी भारतीयांसाठी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण २२५ जागा राखीव अाहेत. मात्र, प्रवेशाची तिसरी फेरी होऊनही यामधील २१७ जागा रिक्त अाहेत. म्हणजे अवघ्या ८ जागांवर एनअारअाय विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला अाहे. दरम्यान, दंत महाविद्यालयांमधील रिक्त जागांचा अाकडा अद्याप जाहीर करण्यात अालेली नाही. 


खासगी वैद्यकीय महाविद्यालये प्रवेशासाठी लाखो रुपये उकळत असल्याने अनिवासी भारतियांसाठी असलेल्या जागा रिक्त अाहेत. गेल्या वर्षीही एनअारअायसाठीच्या १९८ जागा रिक्त होत्या. राज्यात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ३ हजार तर खासगी महाविद्यालयांमध्ये १५०० जागा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अाहेत. यामध्ये एनअारअाय कोट्यातील २२५ जागांचाही समावेश अाहे. संचालनालयाने २७ अाॅगस्ट रोजी वैद्यकीय महाविद्यालयांना रिक्त  जागा भरण्यासाठी ३१ अाॅगस्टपर्यंत मुदत दिली होती.
- डाॅ. प्रवीण शिंगारे, संचालक,  वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय



हेही वाचा -

राज्यातील कॉलेज शिक्षकांची जेलभरो आंदोलनाची हाक!

विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा