Advertisement

बारावीच्या निकालात प्रॅक्टिकल गुण गायब?

जोगेश्वरीतील इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या ५० टक्के विद्यार्थ्यांना नापास केल्याचं प्रकरण नुकतंच उघड झालं आहे. याबाबत सोमवारी ४ जून २०१८ रोजी इस्माईल युसूफ कॉलेजच्या आवारात विज्ञान शाखेतील काही विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन केलं.

बारावीच्या निकालात प्रॅक्टिकल गुण गायब?
SHARES

मुंबई विद्यापीठात निकाल गोंधळ सुरू असतानाच आता नुकताच जाहीर झालेला राज्य मंडळाचा निकाल गोंधळही समोर येत आहे. जोगेश्वरीतील इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या ५० टक्के विद्यार्थ्यांना नापास केल्याचं प्रकरण नुकतंच उघड झालं आहे. याबाबत सोमवारी ४ जून २०१८ रोजी इस्माईल युसूफ कॉलेजच्या आवारात विज्ञान शाखेतील काही विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन केलं.


नेमकं प्रकरण काय?

जोगेश्वरीतील इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये बारावीत विज्ञान शाखेत ३११ विद्यार्थ्यांपैकी १५७ विद्यार्थी पास झाले असून त्यातील १५४ विद्यार्थी नापास झाले आहे. यात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचे गुण देण्यात आले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी कॉलेजवर केला आहे.

हे आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न 

१. प्रात्यक्षिक परीक्षेची जबाबदारी कुणाकडे सोपविण्यात आली होती.
२. शिक्षण मंडळाकडून यासाठी कुणाची नियुक्ती करण्यात आली होती.
३. गणित विषयासाठी वर्षभर प्राध्यापक नव्हते, मग या विषयाची परीक्षा कुणी घेतली व गुण दिले याची माहिती लेखी स्वरूपात द्यावी.
४. महाविद्यालयाने प्रात्यक्षिक परीक्षा व अन्य गुण शिक्षण मंडळाकडे कधी पाठविले याची सविस्तर माहिती देण्यात यावी.
५. प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना मिळावेत या संदर्भात महाविद्यालयाने शिक्षण मंडळाशी संपर्क करून पुढच्या २ दिवसात यावर तोडगा काढावा.
६. जवळपास ५० टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत त्यामुळे याची चौकीशी समिती नेमावी.


कॉलेजकडून टाळाटाळ

याबाबत विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाकडे धाव घेत, त्यांना जाब विचारला असता आम्ही सर्व विद्यार्थ्यांची गुणपत्रे विभागीय मंडळाकडे जमा केली आहेत असे सांगण्यात आल. विशेष म्हणजे आपल्या कॉलेजचे इतके विद्यार्थी नापास झाल असतानाही कॉलेजकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याच समोर आल आहे. 


कॉलेजसमोर आंदोलन

याला विरोध दर्शवण्यासाठी ४ जून रोजी विद्यार्थ्यांनी कॉलेजसमोर आंदोलन केलं. या आंदोलनात विद्यार्थी, त्यांचे पालक, आणि अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचे काही कार्यकर्ते सहभागी झाली होते. या सर्व विद्यार्थ्यांनी मंत्रालयात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेण्यासाठी गेले होते, मात्र शिक्षणमंत्री आणि विद्यार्थ्यांची भेट झाली नसून त्यांचे विशेष अधिकारी श्रीपाद देखणे यांची भेट झाली. त्यांनी हे प्रकरण लक्षात घेऊन नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची एक कमिटी स्थापन करण्यास सांगितलं आहे..

एका वर्गातील एवढे विद्यार्थी नापास होणे शक्य नाही, त्याशिवाय प्रात्यक्षिक परीक्षेत आम्ही एका बॅचमध्ये होतो. ते सर्व माझे मित्र असून ते परीक्षेत नापास झाले आहेत. मी आतापर्यंत संपर्क केलेले ३८ जण नापास झाले आहे. आम्ही नापास होऊ शकत नाही मात्र आमच्या तक्रारीकडे महाविद्यालय दुर्लक्ष करत आहे.
- भार्गवी ठाकूर , विद्यार्थिनी


कॉलेज प्रशासनाकडून बारावीच्या बोर्डाचे गुण न पाठवल्याचा दावा काही विद्यार्थी करत असून तो धाधांत खोटा आहे. आम्ही बारावीला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुण बाेर्डाला पाठवले असून विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका येईपर्यंत थांबावं, तसेच कॉलेजकडून मिळालेल्या प्रक्टिकल गुणाबाबत शंका असेलेल्यांनी पुर्नमूल्यांकनासाठी पुन्हा अर्ज दाखल करावा.
- डॉ. स्वाती व्हावळ, प्राचार्य, इस्माईल युसूफ कॉलेज

अखिल भारतीय विद्यार्थी परीषद आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त ३० विद्यार्थी कॉलेज प्रशासनाला बदनाम करण्याचा डाव रचत आहेत. त्यासंदर्भात आम्ही शनिवारी २ जूनला जोगेश्वरी पोलिस स्टेशन तक्रारही दाखल केली असल्याचं इस्माईल युसूफ कॉलेजच्या प्राचार्य व्हावळ म्हणाल्या.

हे सर्व प्रकरण पाहता याची संपूर्ण जबाबदारी कॉलेजची आहे. त्यामुळे कॉलेजने ही जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबरीपणे उभं राहायला हवं, अशी अखिल भारतीय विद्यार्थी सेनेची मागणी आहे.
- अनिकेत ओव्हाळ, प्रदेशमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

त्याशिवाय नापास झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्याने चुकीचे पाऊल उचल्यास याची संपूर्ण जबाबदार महाविद्यालय प्रशासनाची असेल. त्यामुळे नापास विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन पुढील २ दिवसात हा प्रश्न सोडवावा अन्यथा विद्यार्थी परिषद यासंबंधी आंदोलन तीव्र करेल असा इशारा महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आला आहे.

हेही वाचा - 

मुंबईची पोरं हुश्शार....बारावीच्या परीक्षेत नव्वदीपार

जुलै-ऑगस्टमध्ये होणार १२वीची फेरपरीक्षा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा