Advertisement

अकरावीच्या तिसऱ्या यादीत ५० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

अकरावी प्रवेशाची तिसरी आणि अंतिम गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. तिसऱ्या यादीत ५० हजार ६३६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

अकरावीच्या तिसऱ्या यादीत ५० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश
SHARES

अकरावी प्रवेशाची तिसरी आणि अंतिम गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. तिसऱ्या यादीत ५० हजार ६३६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, तिसऱ्या फेरीअखेर जवळपास ५० टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. तिसऱ्या यादीमध्ये नामांकित महाविद्यालयांच्या कट आॅफ अचानक वधारल्यानं कला आणि वाणिज्य शाखेसाठी मुंबईतील काही नामंकित महाविद्यालयांचे कट आॅफ मागील कट आॅफपेक्षा १ ते ६ टक्क्यांदरम्यान वाढल्याची माहिती समजतं आहे.

१ लाख जागा उपलब्ध

अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या यादीसाठी आॅनलाइन प्रवेशाच्या १ लाख ८ हजार ५५४ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी अर्ज दाखल केलेल्या ७३ हजार ४१४ विद्यार्थ्यांपैकी ५० दजार ६३६ विद्यार्थ्यांनाच तिसऱ्या यादीत प्रवेश देण्यात आले. यात तब्ब्ल १५ हजार ५४४ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचं महाविद्यालय, ९ हजार ८१५ विद्यार्थ्यांना दुसऱ्या तर ७ हजार ००७ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचं महाविद्यालय मिळालं झाले. चौथ्या आणि पाचव्या पसंतीक्रमाचं महाविद्यालय अलॉट झालेले विद्यार्थी अनुक्रमे ५ हजार २९३ आणि ४ हजार १५० आहेत.

कट आॅफमध्ये वाढ

तिसऱ्या कट आॅफ यादीत ज्या नामांकित महाविद्यालयांच्या कट आॅफमध्ये वाढ झाली आहे. या महाविद्यालयांमध्ये के. सी, रूपारेल, मिठीबाई, वझे केळकर, बिर्ला, सीएचएम, केईएस कनिष्ठ महाविद्यालय अशांचा समावेश आहे. या महाविद्यालयांच्या कला शाखेच्या कट आॅफमध्ये वाढ झाली आहे. तर रूपारेल, वझे केळकर, सीएचएम महाविद्यालयांच्या वाणिज्य शाखेच्या कट आॅॅफमध्येही वाढ झाली आहे.

आणखी एक संधी

पहिल्या ३ फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. प्रथम क्रमांकाचं महाविद्यालय मिळूनही १६ हजार ३४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आलं होतं. मात्र, आता या विद्यार्थ्यांना विशेष फेरीत सहभागी होता येणार आहे. त्याशिवाय अद्याप अर्ज न भरलेले आणि अजूनही कुठेही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही या फेरीत सहभागी होता येणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा