स्काऊट गाईड, एनसीसीच्या विद्यार्थ्यांनाही वाढीव गुणांची सवलत


SHARE

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेत यंदा पहिल्यांदाच राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) विद्यार्थ्यांना १० ते २० अतिरिक्त गुण देण्यात येणार अाहेत.  तर स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रपती पदक मिळवल्यास १० गुण मिळणार आहेत. नुकतंच स्काऊट गाईड आणि एनसीसीसोबतच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या गुणांचा सुधारित नियम राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं जारी केला अाहे.  


प्रावीण्यानुसार गुण 

दरवर्षी इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना कला व क्रीडा कोट्यातून विविध अतिरिक्त गुण देण्यात येतात. यासाठी विद्यार्थ्यांना जिल्हा ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला व क्रीडा प्रकारांत प्रावीण्य मिळालेले असण्याची गरज आहे. मात्र यंदा प्रथमच एनसीसी, स्काउट व गाइडच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रावीण्यानुसार गुण देण्यात येणार आहेत.


नवीन नियम

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं जारी केलेल्या नव्या नियमानुसार वय वर्ष १४ ते १६ गटातील म्हणजेच सहावीपासून पुढे जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत तसंच स्काऊड गाईड आणि एनसीसीमध्ये चमकलेल्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे. परंतु ही सवलत मिळण्यासाठी विद्यार्थी कितव्या इयत्तेत असताना खेळात किंवा संचलनात सहभागी झाला आहे, त्याचा उल्लेख असणं महत्त्वाचं असणार आहे. 


असे मिळतील गुण

एनसीसी -

प्रजासत्ताक दिन संचलन, राष्ट्रीय शिबिर सहभाग : १० गुण

प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय शिबिर, संलग्न स्पर्धा पदकविजेते : १५ गुण

आंतराष्ट्रीय यूथ एक्स्चेंज प्रोग्रॅममध्ये सहभाग : २० गुण

स्काऊट  व गाईड -

राष्ट्रपती पदक अथवा आंतरराष्ट्रीय जांबोरी शिबीर सहभाग - १० गुण
संबंधित विषय
ताज्या बातम्या