• घाटकोपरमध्ये जनजागृती रॅली
  • घाटकोपरमध्ये जनजागृती रॅली
SHARE

घाटकोपर (प.) - राम निरंजन झुनझुनवाला कॉलेजमधील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान आणि रस्तासुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन केले. शुक्रवारी 27 जानेवारीला काढलेल्या या रॅलीत एनसीसीच्या विद्यर्थ्यांसोबत कॉलेजचे शिक्षक देखील सहभागी झाले होते. ही रॅली झुनझुनवाला कॉलेजपासून ते हिराचंद देसाई रोड आणि पुढे एलबीएस मार्गापर्यंत काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी ‘रक्तदान श्रेष्ठ दान’, ‘रक्तदान जीवन दान’ ‘थांबा, बघा आणि नंतर रस्ता पार करा’, ‘दारू पिऊन वाहन चालवू नका’ अशा घोषणाही दिल्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या