'बालमोहन'ने साजरा केला बालदिन

 Dadar
'बालमोहन'ने साजरा केला बालदिन
'बालमोहन'ने साजरा केला बालदिन
'बालमोहन'ने साजरा केला बालदिन
See all

दादर - मुंबईच्या दादर विभागात असलेली बालमोहन ही प्रसिद्ध मराठी शाळांपैकी एक आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही सोमवारी 77 वा बालदिन साजरा झाला. शाळेच्या सुपरवायझर शुभदा निगुडकर, क्रीडा शिक्षक विवेक अटाळे आणि मुख्यध्यापक मधुकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बालदिनाला परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा सोहळा शिवाजी पार्क मैदानावर पार पडला.

यावेळी सांस्कृतिक कथक नृत्य शाळेतल्या कम्यूनिटी स्कूलच्या वतीने सादर करण्यात आले. 130 मुलांचा मानवी मनोरा शाळेचे क्रीडा शिक्षक विवेक अटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आला होता. या कार्यक्रमाला शाळेतल्या मुलांनी लेझीम आणि ढोलच्या माध्यमातून एक वेगळीच रंगत आणली होती. 

Loading Comments