Advertisement

शिक्षणाच्या आयचा घो! कंत्राटी शिक्षकापेक्षा सफाई कामगाराचा पगार दुप्पट!


शिक्षणाच्या आयचा घो! कंत्राटी शिक्षकापेक्षा सफाई कामगाराचा पगार दुप्पट!
SHARES

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक सेवकांची भरती करण्यात आलेली असून या सर्व शिक्षक सेवकांना दरमहा सहा हजार रुपये एवढे मानधन दिले जाते. मात्र, या कंत्राटी शिक्षक सेवकांच्या तुलनेत कंत्राटी सफाई कामगार आणि सुरक्षा रक्षकांना तब्बल दुप्पट मानधन दिले जात असून 'सुशिक्षित कर्मचाऱ्यांची हीच काय किंमत?' असा सवाल शिक्षण समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक सेवक ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात आलेली आहेत. त्यांना महिना सहा हजार रुपये एवढे मानधन दिले जात आहे. मात्र, हे मानधन किमान वेतन कायद्याचे उल्लंघन करणारे असून कंत्राटी तत्वावर नेमलेल्या सुरक्षा रक्षक आणि सफाई कामगारांनाही दरमहा १५ हजार ७०० रुपये एवढे मानधन दिले जाते.


ही काय थट्टा आहे. कंत्राटी शिक्षक सेवकांना किमान वेतनाएवढीही रक्कम दिली जात नाही. कोणत्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव तयार केला? शिक्षण समिती कोणत्या अध्यक्षांनी हा प्रस्ताव मंजूर केला? मानधन त्वरीत वाढवले गेले पाहिजे.

डॉ. सईदा खान, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

शिक्षण सेवक या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी व बी.एड् ही शैक्षणिक अर्हता आवश्यक असते. तसेच, त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी टेक्निकल एलिजिबिलिटी टेस्ट (टीईटी) द्यावी लागते. परंतु, उच्च शिक्षित असूनही त्यांना सहा हजार रुपये मानधन आणि दहावी केलेल्या कंत्राटी सुरक्षा रक्षक आणि सफाई कामगारांना दुपटीपेक्षा अधिक मानधन देत एकप्रकारे शिक्षकांचीच खिल्ली उडवली जात असल्याची खंत सईदा खान यांनी व्यक्त केली.

यानंतर शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी या मागणीची सूचना मंजूर करत आयुक्तांकडे पुढील अभिप्रायासाठी पाठवून दिली.हेही वाचा

महापालिकेच्या बालवाडी शिक्षक, मदतनीसांचं मानधन वाढलं


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा