Advertisement

'मुलांनो मोबाईलचा अतिवापर टाळा', शाळांकडून मुलांना मिळावा उपदेशाचा डोस


'मुलांनो मोबाईलचा अतिवापर टाळा', शाळांकडून मुलांना मिळावा उपदेशाचा डोस
SHARES

लहान मुलांकडूनही अाता मोबाईलचा अतिवापर होऊ लागलाय. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच फोनच्या मायाजाळात अडकले अाहेत. विशेष म्हणजे शाळकरी मुलंही मोबाईलच्या अाहारी गेली अाहेत. त्यांना मोबाईलच्या अतिवापरापासून मुलांना परावृत्त करण्याची सुरुवात महापालिका शाळांमधून करण्यात यावी, अशी मागणी अाता जोर धरू लागली अाहे.

मोबाईल हा शालेय मुलांसाठी धोक्याप्रमाणेच अाहे. त्यामुळे मोबाईलच्या अतिवापरापासून परावृत्त करण्यासाठी महापालिका शाळांमध्ये महिन्यातून एकदा समुपदेशन कार्यक्रमांचं अायोजन करावं, अशी मागणी सभागृहनेते यशवंत जाधव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली अाहे.


मुलांच्या स्मरणशक्तीवर परिणाम

मोबाईल फोनचा अतिवापर अाणि सोशल नेटवर्किंगच्या जंजाळात अडकलेल्या तरुणांना विविध आजारांनी ग्रासलं आहे. याच कारणांमुळे शाळकरी मुलांमध्येही चंचलता, अस्थिरता वाढीस लागली आहे. त्याचा मुलांच्या स्मरणशक्तीवर विपरित परिणाम होत असल्याचं निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवलं गेल्याचं यशवंत जाधव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारं म्हटलं आहे.


मोबाईलमुळे पाठांतराकडे दुर्लक्ष

शालेय जीवनात पाठांतराला विशेष महत्त्व असतं. मात्र विशिष्ट गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मेंदूला ताण द्यायची सवय मोबाईल फोनच्या अतिवापरामुळं मुलांमध्ये कमी होती चालली आहे. यातून विसराळूपणा, लक्ष विचलित होण्याचं प्रमाणही लहान मुलांमध्ये वाढीस लागलं आहे. एवढंच नव्हे, तर यू ट्यूब, सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप यामध्ये रमणाऱ्या मुलांमध्ये कमालीचा संताप, अस्थिरता आणि आक्रस्ताळेपणा वाढल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. याकरिता शाळकरी मुलांना मोबाईल फोनच्या मर्यादित वापरासाठी मार्गदर्शन करणं, ही नितांत गरजेची बाब असल्याचं यशवंत जाधव यांनी म्हटलं आहे.

संबंधित विषय
Advertisement