Advertisement

पालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई शाळांचे प्रवेश सुरू

मुंबई महापालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या मुंबई पब्लिक स्कूलची प्रवेशप्रक्रिया २७ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.

पालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई शाळांचे प्रवेश सुरू
SHARES

मुंबई महापालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या मुंबई पब्लिक स्कूलची प्रवेशप्रक्रिया २७ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. प्रवेशप्रक्रिया १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी अर्ज ऑफलाइन तसेच ऑनलाइन उपलब्ध होतील होणार आहेत. ऑनलाइन प्रवेशअर्ज  http://portal.mcgm.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध होतील.

मुंबई महापालिकेतर्फे सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार ज्युनियर केजीसाठी ४ वर्षे पूर्ण असणाऱ्या तसेच इयत्ता पहिलीसाठी ६ वर्षे पूर्ण असणाऱ्या पाल्यांना प्रवेश दिला जाणार आहे. २५ जुलै २०१९ पर्यंत ही वयोमर्यादा पूर्ण करणारे विद्यार्थीच प्रवेशासाठी पात्र होणार आहेत. याशिवाय शाळेपासून ३ किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या पाल्याला प्रवेशात प्राधान्य दिलं जाणार आहे. प्रत्येक वर्गासाठी येणाऱ्या प्रवेश अर्जाची संख्या ४० च्या पुढे गेल्यास लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

या शाळा सुरू होणार 

  • मुंबई पब्लिक स्कूल – आयसीएसई बोर्ड – वुलन मिल्स, माहीम (पश्चिम)
  • मुंबई पब्लिक स्कूल – सीबीएसई बोर्ड – पूनम नगर, जोगेश्वरी (पूर्व)

प्रवेशाचे वेळापत्रक

  • ऑनलाइन, ऑफलाइन प्रवेशअर्ज – 27 फेब्रुवारी ते 12 मार्च
  • (ऑफलाइन प्रवेशअर्ज शाळेमध्ये सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 या वेळेत मिळतील. याच वेळेत भरलेले अर्ज जमा करावेत.)
  • अर्जांची छाननी, पालक समुपदेशन – 13 मार्च ते 24 मार्च
  • प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी – 24 मार्च
  • विद्यार्थी संख्या जास्त असल्यास लॉटरी प्रक्रिया – 26 ते 28 मार्च
  • अंतिम यादी जाहीर – लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी
  • नावनोंदणी – 31 मार्चपर्यंत
  • शैक्षणिक वर्षाला सुरुवात – सीबीएसई एप्रिल 2020, आयसीएसई जून 2020हेही वाचा -

मराठी भाषा गौरव दिन : राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये साजरा

राज्यातील आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त, शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत माहिती
संबंधित विषय
Advertisement