Advertisement

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या १८७५ विद्यार्थ्यांचं बीएमसीकडून लसीकरण

लसीचा तुटवडा असल्याने अनेक विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहिले होते. या विद्यार्थ्यांनी लस घेतल्यानंतरच त्यांना परदेशात प्रवेश मिळणार होता.

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या १८७५ विद्यार्थ्यांचं बीएमसीकडून लसीकरण
SHARES

उच्च शिक्षणासाठी (higher education) परदेशात (abroad) जाणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यापूर्वी कोरोनावरील लस (corona vaccine) देणं आवश्यक आहे. मुंबईत (mumbai) १८७५ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे. 

लसीचा तुटवडा असल्याने अनेक विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहिले होते. या विद्यार्थ्यांनी लस घेतल्यानंतरच त्यांना परदेशात प्रवेश मिळणार होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे लसीकरण करणं गरजेचं आहे. मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) राजावाडी, कस्तुरबा आणि कूपर रुग्णालयात परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली. 

मागील दोन दिवसात १८७५ परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. बुधवारीही परदेशी शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे राजावाडी, कस्तुरबा आणि कूपर रुग्णालयात लसीकरण केलं जाणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रांवर ३०० डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 

लस घेताना विद्यार्थ्यांनी परदेशी विद्यापीठ प्रवेश निश्चिती पत्र, परदेशी व्हिसा, व्हिसा मिळवण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले आय-२० किंवा डीएस-१६० फॉर्म ही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.



हेही वाचा -

आता रस्त्यावर थुंकल्यास १२०० रुपये दंड; महापालिकेचा निर्णय

नवी मुंबईत आता रुग्णालयांमध्येच डिस्चार्जपूर्वी होणार बिलांची तपासणी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा