Advertisement

दप्तराचं ओझं कमी करण्याच्या आदेशाचं काय केलं? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल


दप्तराचं ओझं कमी करण्याच्या आदेशाचं काय केलं? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल
SHARES

शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत राज्य सरकारच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याची बाब याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली होती. त्यावर उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारन गेली दोन वर्षे काय केल, असा सवाल करत सरकारला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

२०१६ मध्ये काढला शासन निर्णय 

विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांना पाठदुखीचा त्रास सुरू होतो तसेच अनेक विकार उदभवतात. त्यामुळे शाळेतच लॉकर पद्धत सुरू करावी व मुलांचे तासही कमी करावेत, अशी विंनती पाटील यांनी याचिकेद्वारे न्यायालयाला केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत शासन निर्णय काढण्याचे निर्देश दिले होते.

सरकारने २०१६ मध्ये शासन निर्णय काढला. तसेच याची अंमलबजावणी केली जाते की नाही, हे पाहण्यासाठी प्रत्येक शाळेची पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय अधिकारीही नेमले. नेमण्यात आलेल्या या अधिकाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला पुणे शिक्षण संचालकांकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

एकाही शाळेवर कारवाई नाही

प्रत्यक्षात या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येते की नाही, हे जाणण्यासाठी पाटील यांनी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला. या अर्जाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये राज्यातील केवळ ७ ते ८ टक्के शाळांची तपासणी करण्यात आली. तर २०१८ मध्ये एकही शाळेचा अहवाल संचालकांपर्यंत पोहचला नाही. तसेच या दोन वर्षांत एकाही शाळेवर कारवाई करण्यात आली नाही. ही बाब पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गेली दोन वर्षे काय केलेत, असा सवाल करत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा