Advertisement

'परीक्षेदरम्यान पुरवणी का देणार नाही? याचं उत्तर द्या' - उच्च न्यायालय


'परीक्षेदरम्यान पुरवणी का देणार नाही? याचं उत्तर द्या' - उच्च न्यायालय
SHARES

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी मुख्य उत्तरपत्रिकेव्यतिरिक्त पुरवण्या मिळणार नाहीत, या निर्णयाचं समर्थन कसं केलं जाऊ शकतं, याचं उत्तर गुरुवारपर्यंत प्रतिज्ञापत्रावर द्यावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई विद्यापीठाला दिले.

दिल्लीतून मुंबईत विधी अभ्यासक्रम (लॉ) याचं शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मानसी भूषण या विद्यार्थिनीनं मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकेवरील निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.


'आधी या त्रुटी दूर करा'

यापुढे उत्तरपत्रिकांसोबत पुरवणी पत्रिका मिळणार नसल्याचा निर्णय विद्यापीठानं ९ आॅक्टोबर रोजी घोषित केला होता. या निर्णयामुळे आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा दावा करत मानसीने विद्यापीठाला कोर्टात खेचले. १२ डिसेंबरच्या सुनावणीत विद्यापीठानं आपल्या ऑनलाईन असेसमेंट पद्धतीतील त्रुटी दूर करण्याऐवजी विद्यार्थ्यांवर बंधने लादणे चुकीचं असल्याचं म्हणत खंडपीठाने विद्यापीठाला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.


म्हणून विद्यापीठाने घेतला हा निर्णय

मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना ८० गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात येते. तर २० गुण प्रॅक्टिकल, प्रोजेक्टसाठी दिले जातात. ८० गुणांच्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी बहुतांशी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची ४० पानं पुरत नसल्यानं हे विद्यार्थी पुरवणी घेऊन उत्तरे लिहितात. मात्र ऑनलाईन पेपर तपासणीत उत्तरपत्रिका स्कॅनिंग करताना या पुरवण्या गहाळ झाल्याचे प्रकार घडतात. यावर्षी विद्यापीठाने राखून ठेवलेल्या २३०० विद्यार्थ्यांच्या निकालात पुरवण्या गहाळ झाल्याचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळेच यापुढे पुरवणी न देण्याचा निर्णय घेतल्याचे मुंबई विद्यापीठाने सांगितलं.


हुशार विद्यार्थी या प्रश्नांसह अतिरिक्त प्रश्नांची उत्तरंही लिहितात. त्यात एका दीर्घोत्तरी प्रश्नासाठी काही विद्यार्थ्यांना ७ ते ८ पानं लागतात. अशा परिस्थितीत केवळ मोठ्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यास ३० हून अधिक पानं लागतात. परिणामी, उरलेल्या पानांत संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवायची तरी कशी, या तणावात विद्यार्थी आहेत.

- मानसी भूषण, विद्यार्थिनी, शासकीय विधी महाविद्यालय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा