Advertisement

तुमचा मुलगाही होमवर्क न केल्याबद्दल ‘ही’ कारणं देतो का? जाणून घ्या या मागचं कारण

विद्यार्थी आणि गृहपाठ यांच्यातील कडूगोड नातेसंबंध जाणून घेण्यासाठी ब्रेनली, या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन पीयर-टू-पीयर लर्निंग कम्युनिटीने नुकतंच एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणातून समजलं की,जवळपास ४९% विद्यार्थी होमवर्क करण्यास टाळाटाळ करतात.

तुमचा मुलगाही होमवर्क न केल्याबद्दल ‘ही’ कारणं देतो का? जाणून घ्या या मागचं कारण
SHARES

तुम्हाला वाटत असेल की फक्त तुमचाच मुलगा किंवा मुलगी शाळेतील होमवर्क करण्यास टाळाटाळ करतो आणि त्यासाठी तो दरवेळी वेगवेगळी कारणे देते, तर असं वाटणारे तुम्ही एकटेच नाहीत. विद्यार्थी आणि गृहपाठ यांच्यातील कडूगोड नातेसंबंध जाणून घेण्यासाठी ब्रेनली, या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन पीयर-टू-पीयर लर्निंग कम्युनिटीने नुकतंच एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणातून समजलं की,जवळपास ४९% विद्यार्थी होमवर्क करण्यास टाळाटाळ करतात आणि आपण त्यासाठी वेगवेगळी कारणं देत असल्याचंही ते कबूल करतात.  

मजेशीर कारणं

जेव्हा विद्यार्थ्यांना कारणे देण्याची आवश्यकता निर्माण होते तेव्हा ते ‘होमवर्क हरवला’ (१८.७%०), ‘शरीराला दुखापत’ (१४.६%), अशा कारणांसह ‘कुत्र्याने होमवर्क खाल्ला’(४%), ‘कोणीतरी माझ्या दप्तरातून पळवला’(१३.१%), 'त्याच्यावर शाई सांडली’ (८.२%)  अशी काही मजेशीर करणे देखील देतात.

३० टक्के विद्यार्थ्यांची कबुली

या सर्वेक्षणात २००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. या सर्वेक्षणात वेळेवर होमवर्क न केल्यामुळे विद्यार्थ्यांनी दिलेल्या कारणांचा तपास करण्यात आला. या सर्वेक्षणातील ६९.८% धाडसी विद्यार्थ्यांचा गट म्हणाला की त्यांनी होमवर्क न केल्याबद्दल कधीच कारणं दिली नाहीत, तर जवळपास ३०% विद्यार्थ्यांनी ते वारंवार सबबी सांगत असल्याचं मान्य केलं. 

कारणं अस्सल वाटण्यासाठी

कारणं देताना, ती यशस्वी व्हावीत यासाठी विद्यार्थी शक्यतो अस्सल आणि पटणाऱ्या अशा दोन प्रकारच्या सबबी शोधत असतात. या कारणांमध्ये ‘होमवर्क हरवला’, ‘डोकेदुखी’ (१४.१%), ‘सांगता न येण्याजोगं कुटुंबात उद्भवलेलं संकट’ (९.८%), ‘वैयक्तिक इजा’(१४.६%) या सामान्य कारणांसह ‘कुत्र्याने होमवर्क खाल्ला’(४%), ‘कोणीतरी माझ्या दप्तरातून पळवला’(१३.१%), शाई किंवा कॉफी  सांडली’ (८.२%),‘लॅपटॉप क्रॅश झाला’(६.१%), ‘दुसऱ्या क्लासच्या वहीत केलं’(४.४%),‘माझ्या हातातून वाऱ्याने उडून गेला’(४%),‘आगीत जळून गेला’(३.४%)’ इ. मजेशीर कारणांचा समावेश होता.

इंटरनेटची आवश्यकता

या सर्व मजेशीर प्रतिसादांमध्ये ७०% पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वाटतं की जर त्यांना पुरेशी ऑनलाइन मदत मिळाली तर ते त्यांचा होमवर्क वेळेत पूर्ण करतील. त्यामुळे नजिकच्या भविष्यात विद्यार्थ्यांना त्याचा अधिक लाभ मिळण्यासाठी इंटरनेटला अधिक सक्षम बनवण्याची गरज अधोरेखित होते. 

होमवर्कची भीती

या संदर्भात ब्रेनलीचे सहसंस्थापक आणि सीईओ मिशल बोर्कोस्की म्हणाले की, “अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांना होमवर्कची नेहमीच भीती वाटत राहिली आहे. आम्ही या सर्वेक्षणाद्वारे काही बाबी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि बहुतांश वेळा होमवर्कच्या भीतीतून बाहेर पडण्यात असमर्थ असल्यानेच मुलं वेगवेगळी कारणं देतात असं आमच्या लक्षात आलं आहे. याउलट होमवर्क पूर्ण झाल्यावर पालक किंवा शिक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये होमवर्क पूर्ण करण्याची वृत्ती निर्माण होते.

उत्साही वातावरणात एक पीयर-टू-पीयर दृष्टिकोन असणं ही केवळ होमवर्क मनोरंजक आणि आकर्षक ठेवण्याची संकल्पना नाही, तर त्याच्यामुळे शिक्षणही अधिक प्रभावी बनते. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन स्रोत आणि सहयोग स्वीकारल्यास, ब्रेनलीसारख्या व्यासपीठामुळे होमवर्कची कार्यपद्धत कमी कठीण आणि अधिक फलदायी होऊ शकते. त्यातून अधिक शिकायला मिळतं आणि विद्यार्थ्यांना प्रश्नांपासून उत्तरापर्यंतचे मार्गदर्शन मिळतं.”हेही वाचा-

'त्यांनी' भागवली ६ गावांची तहानसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा